BCCI मोठा निर्णय, यंदा IPL मध्ये नाही होणार उद्घाटन सोहळा; नो-बॉल पाहण्यासाठी असणार चौथा अंपायर
IPL Opening Ceremony (Photo Credit: Wikimedia)

इंडियन प्रेमिअर लीग (Indian Premier League) च्या 13 व्या मोसमाला काही अवधी बाकी आहे. आयपीएल (IPL) 2020 साठी खेळाडूंचा लिलाव येत्या डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पण, त्यापूर्वीच बीसीसीआयने (BCCI) पुढील वर्षीच्या आयपीएल संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने आयपीएलचा उद्घाटन सोहळा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने त्यास 'खूप महाग' मानत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. आयपीएलच्या उदघाटन सोहळ्यासाठीमोठ्या संख्येने बॉलिवूड सेलिब्रिटींना बोलविण्यात येते. मागील वर्षी यासाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या बैठकीत केवळ नो-बॉलवर (No-Ball) लक्ष केंद्रित करण्यासाठी लीगमध्ये चौथा अंपायर नियुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले. (IPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाब संघाला सोडचिट्ठी देत रविचंद्रन अश्विन 'या' संघाशी जुडण्यास सज्ज, लवकरच होणार घोषणा)

इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, उद्घाटन सोहळा हा पैशाचा अपव्यय आहे. क्रिकेट चाहत्यांना यात रस नाही आणि कलाकारांना अजून खूप पैसे द्यावे लागतात.” मागील काही वर्षांमध्ये आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात कॅटी पेरी, एकॉन आणि पिट बुल यासारख्या बॉलिवूड (Bollywood) आणि आंतरराष्ट्रीय पॉप स्टार्सनी परफॉर्मन्स सादर केले आहेत. दरम्यान, बॉल-बॉलच्या निर्णयाबद्दल एका अधिकाऱ्याने सांगितले की, “मागील हंगामात बऱ्याच खेळाडूंना बाद केले गेले होते आणि नंतर रिप्लेमध्ये दर्शविले गेले की गोलंदाजांनी ओव्हर स्टेप केले आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

पुढील वर्षासाठी आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबर रोजी कोलकातामध्ये होणार आहे. आयपीएल 2019 साठी फ्रँचायझींना 82 कोटी रुपये देण्यात आले होते, तर 2020 हंगामात प्रति संघ 85 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली याने मंडळाचे अध्यक्षपद संभाल्यानंतर या सुधारणेकडे एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.