IPL 2020: आयपीएलपूर्वी होणाऱ्या ऑल स्टार्स सामन्याच्या वेळेत बदल, आता 'या' वेळी खेळली जाणार मॅच
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

आयपीएलचा (IPL) 13 वा सत्र सुरू होण्यापूर्वी खेळलेला ऑल स्टार गेम (All Star Game) आता पुढे ढकलला गेला आहे. स्पर्धा संपल्यानंतर आता हा सामना खेळला जाईल. आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून होईल. मात्र, आयपीएलपूर्वी होणार सामना आता या स्पर्धेनंतर होणार असं म्हटलं जात आहे. याची पुष्टी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनी केली. मुंबई मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सर्व फ्रॅन्चायझींनी त्यांच्या खेळाडूंनी हंगाम सुरू होण्यापूर्वी असा कोणताही सामना न खेळावा अशी इच्छा आहे. सामन्यादरम्यान त्यांचे मुख्य खेळाडू जखमी होऊ नये आणि त्यांच्या स्टार खेळाडूंना संपूर्ण स्पर्धेलाही मुकावे लागू नये अशी त्यांना भीती आहे. ऑल स्टार गेम घेण्याचा निर्णय 28 जानेवारी रोजी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला होता, परंतु याबाबत आठही फ्रँचायझींशी सल्ला केला गेला नव्हता. (IPL 2020: टीम इंडियानंतर 'या' संघाकडून एकत्र खेळणार एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा; BCCI के केलायं प्लॅन)

पटेल यांनी वेबसाइटला सांगितले की, "हा सामना स्पर्धेनंतर खेळला जाईल." ते म्हणाले, "आम्ही खेळाडूंची कामगिरी पाहू आणि त्या आधारे दोन्ही संघांची निवड केली जाईल." गेल्या महिन्यात आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी ऑल स्टार मॅचची घोषणा केली होती. ऑल-स्टार्स सामन्यात आयपीएलच्या आठही फ्रँचायझीतील खेळाडूंचा समावेश असण्याची शक्यता आहे. आधीच्या मीडिया रिपोर्टनुसार दक्षिण आणि पश्चिम भारत संघ (मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद) एक संघ बनवतील आणि उत्तर आणि पूर्व भारत संघ (दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब) दुसरा संघ तयार करतील.

आयपीएलच्या 13 व्या सत्राचा पहिला सामना 29 मार्च रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल.