महाराष्ट्र दूध आंदोलकांना भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा यांचा सल्ला, म्हणाले- 'दूध वाया घालण्याऐवजी भुकेल्या मुलांना द्या'
आकाश चोपडा (Photo Credit: Instagram)

दुध दरवाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्र दुग्ध उत्पादकांचे (Maharashtra Dairy Farmers) राज्यव्यापी आंदोलन मंगळवारी दुसर्‍या दिवशीही कायम राहिले. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी दुग्धशाळेचे शेतकरी राज्यातील विविध भागात निदर्शने करीत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेसह स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) करीत आहेत. या निषेधाचा परिणाम विशेषत: मुंबई व त्याच्या आसपासच्या भागात जाणवला. निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कामगार कोल्हापूरच्या रस्त्यावर दुधाचा टँकर फोडला. आज दुसर्‍या दिवशी आंदोलन कर्त्यांनी दुधाने भरलेले टँकर थांबवून हजारो लिटर दुधाचा रस्त्यावर निचरा केला. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या पक्ष स्वाभिमानी शेतकरी यांच्या कार्यकर्त्यांनी आज अनेक ठिकाणी दुधाच्या टँकरची तोडफोड केली. या आंदोलन कर्त्यांना भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा (Aakash Chopra) याने सल्ला म्हणून दूध वाया न घालवण्याचे आवाहन केले. (Milk Price Agitation: दूध दर आंदोलन भडकले; सांगली, कोल्हापूरमध्ये टँकर फोडले, बैलांना दुग्धाभिषेक; मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष)

चोपडा म्हणाले,"तुम्हाला जमेल तोवर लढा द्या. आंदोलन करा आणि मागणी करा. परंतु इतके दूध वाया जाण्याऐवजी भुकेल्या मुलांना द्या."

पाहा चोपडा यांची पोस्ट:

दरम्यान, PTI शी बोलताना शेट्टी म्हणाले की, दुधाच्या दर लिटरमागे 5 रुपये वाढवावेत आणि त्याचा फायदा थेट दूध उत्पादकांच्या खात्यात जमा व्हावा अशी त्यांची मागणी आहेत. ते म्हणाले, “आम्ही दूध उत्पादकांना 30 रुपये निर्यात अनुदान आणि दूध उत्पादनांवर आकारला जाणारा जीएसटी रद्द करण्याची मागणी करत आहोत.” शेट्टी यांनी 10,000 टन दूध पावडर आयात करण्याचा केंद्राचा निर्णय रद्द करण्याचीही मागणी केली. ते म्हणाले की, “केंद्र सरकारच्या धोरणांमुळे राज्यात दुध व्यवसायावर परिणाम झाला आहे.” दुसरीकडे, दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार असल्याचेही भाजपा पुणेचे अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले.