IPL Auction 2025 Live

INDW vs ENGW, Women's T20 World Cup Semi Final Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Star Sport वर

भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघाला सेमीफाइनलमध्ये जागा मिळवली आहे.

भारत महिला क्रिकेट संघ (Photo Credit: Getty Images)

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषकातील (Women's T20 World Cup) अंतिम चार संघांमधील सेमीफायनल सामने निश्चित झाले आहे. भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघाला सेमीफाइनलमध्ये जागा मिळवली आहे. दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड (INDW vs ENGW) यांच्यात 5 मार्च रोजी पहिला सामना खेळण्यात येणार आहेत, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) रंगणार आहे. महत्वाचे म्हणजे, हे सामने एकाच दिवशी खेळले जाणार आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषकात भारतीय संघाकडून जोरदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाने पुढेही अशीच कामगिरी करतील, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. महिला टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने 'अ' गटात 0.979 च्या सरासरीने 8 गुणांसह अव्वल स्थान मिळवले. दरम्यान, हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने एकही समाना गमवला नाही. भारतीय संघाची तडाखेबाज फलंदाज शेफाली वर्माने चांगले प्रदर्शन करून अनेकांची मन जिंकली आहे. Women's T20 World Cup Semi-Final: महिला टी-20 विश्वचषक सेमीफायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणल्यास कशी असेल भारताची स्थिती, जाणून घ्या

गुरुवारी सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय महिला संघ पहिला सेमीफायनल सामना इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. तथापि, गुरुवारी पाऊस सामन्याची मजा खराब करू शकतो. सामन्यातील दुसरा सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याच मैदानावर होईल. विजेते आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2020 च्या अंतिम सामन्यात पोहचतील. हा सामना 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी एमसीजीमध्ये खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाने चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. 2009 मध्ये इंग्लंडने पहिले महिला टी-20 विश्वचषक जिंकले आहे.

भारत: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), तानिया भाटिया, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड़, ऋचा घोष, वेदा कृष्णमूर्ति, स्मृति मंधाना, शिखा पांडे, पूनम यादव, अरुंधति रेड्डी, जेमिमा रोड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव.

इंग्लंड : हीथर नाइट (कर्णधार), एमी एलेन जॉन्स, डेनियेने व्हॅट, नताली स्किवेर, फ्रान विलसन, कॅथरीन ब्रंट, टॅमी ब्यूमोन्ट, लॉरेन विनफील्ड, फ्रेया डेव्हिस, सोफी एसेलेस्टोन, सारा ग्लेन, आन्या श्रुबसोले, जार्जिया एल्विस, कॅट क्रास, मॅडी विलर्स