भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील वनडे मालिकेला 19 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेत भारताला यजमान आफ्रिकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते, पण टीम इंडियाला (Team India0 वनडे मालिका जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करण्याच्या निर्धारित असेल. भारतीय संघाचा (Indian Team) वनडे नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे या मालिकेत खेळत नसल्यामुळे त्याच्या जागी संघाची कमान केएल राहुलकडे (KL Rahul) सोपवण्यात आली आहे. तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. ही मालिका खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) संघात पाहणे विशेषतः संघाचे नेतृत्व न करताना पाहणे एक वेगळा अनुभव असणार आहे. राहुलच्या नेतृत्वात पहिल्यांदा खेळणे संघासाठी एक आगळा-वेगळा अनुभव असणार आहे. त्यामुळे पार्ल (Paarl) येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहे. (IND vs SA ODI 2022: कर्णधार Temba Bavuma ने फुंकले रणशिंग, कसोटीनंतर वनडे मालिका काबीज करण्यासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज)
नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाचे नेतृत्व करताना दिसेल. तर व्यंकटेश अय्यरला पदार्पण एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळू शकते. हार्दिक पांड्या संघात नसल्यामुळे अय्यर अष्टपैलू म्हणून बिलकुल तंतोतंत बसतो. तसेच गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यानंतर टी-20 वर्ल्ड कप संघातून बाहेर बसलेला अनुभवी सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा ओपनरच्या भूमिकेत दिसेल. कर्णधार राहुलसह धवन सलामीला उतरेल. विराट कोहली आपल्या नियमित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तर सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, आणि रिषभ पंत मधल्या फळीत संघाला संतुलित करतील. याशिवाय तब्ब्ल चार वर्षानंतर रविचंद्रन अश्विनचे संघात पुनरागमन होईल. अश्विनसह युजवेंद्र चहल संघात आणखी एक फिरकी गोलंदाज असेल. तसेच जसप्रीत बुमराहच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणात शार्दूल ठाकूर आणि दीपक चाहरचा समावेश असेल.
भारताचा संभावित प्लेइंग XI: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर.