वेस्ट इंडिजचा 'Hulk' रहकीम कोर्न्वल याला पाहून भारताच्या दीपक चाहर च्या तोंडाचे पाणीच पळाले, पहा हा मजेदार (Video)
दीपक चाहर आणि राहकेम कॉर्नवाल (Photo Credit: Mushfiqur Fan/ Tweet)

भारतीय संघाचे विश्वकपमधील आवाजानं सेमीफायनलमधील पराभवामुळे संपुष्टात आले. पण, आता या पराभवाला विसरून टीम इंडिया (Team India) ला पुढे जायचे आहे. विश्वकपनंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिज (West Indies) दौर्याला जाणार आहे. 3 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या या दौर्या दरम्यान भारतीय संघ 3-वनडे, 3-टी-20 आणि 2 टेस्ट मालिका खेळणार आहे. पण त्याआधी, भारत ए आणि वेस्ट इंडिज ए संघात तीन अनधिकृत वनडे सामने खेळण्यात आले आहे. यापैकी तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय फिरकीपटू दीपक चाहर (Deepak Chahar) आणि इंडीजचा रहकीम कोर्न्वल (Rakheem Cornwall) यांच्यात एक मजेदार घटना घडली. (India A vs West Indies A ODI Series: वेस्ट इंडिज ए संघाला 148 धावांनी पराभूत करत इंडिया ए ने लावली विजयाची हॅट-ट्रिक)

भारत ए आणि वेस्ट इंडिज ए संघात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्याच्या भारताने दिलेल्या 295 धावांचा पाठलाग करत 27व्या ओव्हरमध्ये डेव्हन थॉमस माघारी परतला. त्यानंतर वेस्ट इंडिजचा 7 व्या क्रमांकावर अष्टपैलू राहकेम कॉर्नवाल फलंदाजी करायला आला. त्याची शरीर वृष्टी इतकी प्रचंड आहे की त्याच्या समोर एक मजबूत खेळाडूही देखील छोटा दिसेल. सामन्यात तो काही खास करू शकला नाही आणि पण मैदानावर येताना विरुद्ध दिशेने चाहर कोर्न्वलच्या जवळ पोहोचला आणि अचानक त्याच्या समोर आला. पण चाहरने त्वरित आपली दिशा बदलली आणि बाजूला झाला. या दरम्यान, कोर्न्वल थांबला नाही आणि सरळ चालत गेला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. धीप्पात शरीर असलेल्या कोर्न्वलची लांबी 6 फूट 5 इंच आहे आणि वजन 130 किलो आहे.

वेस्ट इंडिजसाठी कोर्न्वलने शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची विकेट घेतली, पण बॅटने तो काही खास करू शकला नाही.