India vs West Indies: 'विराट' खेळी करत कोहलीचे शतक; रिषभ पंत ९२वर बाद, शंभरी हुकल्याची हळहळ
विराट कोहली (Photo Credits: Twitter)

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात कोहलीने आपल्या 'विराट' खेळीचे प्रदर्शन करत शतकी खेळी केली. तर, रिषभ पंतनेही उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, ९२ धावांवर बाद झाल्याने त्याची शतकी खेळी हूकली. त्याच्या हुकलेल्या शतकाबद्दल क्रिकेट चाहत्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. कोहलीचं टेस्ट क्रिकेटचं २४ वं शतक असून, त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ५९  शतकं ठोकली आहेत.

या कामगिरीमुळे विराट आता फक्त सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंग, श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेच्या जॅक्स कॅलिस यांच्या काही शतकेच मागे आहे.

विराट सोबत रिषभ पंत सुद्धा शतकाच्या उंभरठ्यावर होता पण तो ९२ रन्स वर आऊट झाला. भारत सध्या ५ बाद ४७० रन्स वर खेळत आहे.