IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेमध्ये पुन्हा पावसाने घातला खोडा, खेळ थांबवला
(Photo Credit: @BCCI/Twitter)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तिसरा वनडे सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला आहे. खेळ थांबवण्यात आला तेव्हा वेस्ट इंडिजची 2 बाद 158 अशी स्थिती होती. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने आपल्या संघात दोन बदल केले होते, तर भारताने एक बदल केला होता. या सामन्यात भारताने फिरकीपटू कुलदीप यादव याला वगळून युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला संधी देण्यात आली आहे. तिसरा आणि अंतिम वनडे सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर खेळाला जात आहे. (IND vs WI 3rd ODI: क्रिस गेल याचा अखेरचा सामना, आऊट झाल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी खास शैलीत केले अभिवादन)

3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे आजच्या सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. भारत हा सामना जिंकत वनडे मालिका देखील खिशात घालण्याच्या निर्धारित असेल, तर विंडीज संघ मालिका वाचवण्यासाठी खेळात असेल. विंडीजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle)चा हा करिअरमधील अखेरचा सामना आहे. आज गेलने तूफानी खेळी करत पुन्हा एकदा चौकर आणि शतकारांचा पाऊस पडला. गेल खूपच आक्रमक दिसत होता आणि तो तशीच फलंदाजी करीत होता पण खलील अहमद (Khaleel Ahmed) याच्या चेंडूने त्याचा डाव संपुष्टात आणला. या सामन्यात गेलने चांगली फलंदाजी केली. या सामन्यात गेलने 41 चेंडूंत 72 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 175.61 होता. त्याने पहिल्या विकेटसाठी इव्हिन लुईसची साथ मिळवून आपल्या संघाला चांगली सुरुवात दिली.

भारतीय संघाची वेस्ट इंडिज दौऱ्यात चमकदार कामगिरी होत आहे. मागील वनडे जिंकत भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. आजचा सामना जिंकत टीम इंडिया वनडे मालिकादेखील जिंकण्याच्या निर्धारित असेल.