रांचीमधील जेएससीए स्टेडियममध्ये खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला आहे आणि पुन्हा खेळ सुरू होण्याची शक्यता फारच कमी आहे.

रांची येथे खेळल्या जाणार्‍या तिसर्‍या कसोटीच्या चहाची वेळ झाली आहे. सुरुवातीस राखडल्यावर आता भारताचा डाव सावरला आहे. टी पर्यंत रोहित शर्मा 118 आणि अजिंक्य रहाणे 74 धावांवर खेळात होते. चौथ्या विकेटसाठी रोहित आणि रहाणे यांच्यात 220 चेंडूत 166 धावांची भागीदारी आहे.

रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यात चांगली भागीदारी झाली आहे आणि आता दोघे वेगाने धावा करत आहेत. अखेरच्या 10 ओव्हरमध्ये दोघांनी भारताच्या धावांमध्ये 50 धावा जोडल्या. यासह भारताने 200 धावांचा टप्पा गाठला . 

तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये सलामी फलंदाज रोहित शर्मा याने सावध खेळी करत शतक पूर्ण केले. रोहितचे हे सहावे टेस्ट शतक असून या मालिकेतील हे तिसरे शतक आहे. या खेळीदरम्यान रोहितने 27 चौकार आणि 4 षटकार लगावला. रोहितने 130 चेंडूत शतक पूर्ण केले. 

तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये सलामी फलंदाज रोहित शर्मा याने सावध खेळी करत शतक पूर्ण केले. रोहितचे हे सहावे टेस्ट शतक असून या मालिकेतील हे तिसरे शतक आहे. या खेळीदरम्यान रोहितने 27 चौकार आणि 4 षटकार लगावला. रोहितने 130 चेंडूत शतक पूर्ण केले. 

अजिंक्य रहाणे याने डीन पीट याच्या पहिल्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेऊन राहणेने अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने 70 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. जे आतापर्यंतचे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. या खेळीत त्याने आठ चौकार लगावले.

एनरिच नॉर्टजे याच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा ने मिड-ऑफवर चौकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितने 86 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. या खेळीत त्याने आठ चौकार आणि एक षटकार लगावला आहे.

लंचनंतर भारताची धावसंख्या 100 च्या पुढे गेली आहे. याचबरोबर अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्यात 77 चेंडूत 63 धावांची भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज वेगाने धावा करीत आहेत

खराब सुरुवात झाल्यानंतर टीम इंडियाने लंचपर्यंत 3 विकेट गमावून 71 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या टेस्टमध्ये भारताने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकी गोलंदाजांनी सुरुवातीला भारताला तीन मोठे धक्के दिले. मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. 

आज सामन्याच्या सुरुवातीला कगिसो रबाडाने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिले दोन झटके देऊन त्याने भारतावर दबाव आणला आहे. रबाडानंतर एनरिच नॉर्टजेने भारताला तिसरा झटका दिला. नॉर्टजेने कर्णधार विराट कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट करून माघारी पाठवले. यासह भारताने 50 धावांच्या आत 3 गडी गमावले. 

Load More

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात होणाऱ्या 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील आज तिसरा आणि अंतिम सामना रांचीच्या (Ranchi) जेएससीए स्टेडियममध्ये खेळला जाईल. मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने 2-0 अशी मालिका जिंकली आहे. आणि आजच्या सामन्यात विजय मिळवत क्लीन-स्वीप पूर्ण करण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल. आजच्या मॅचमध्ये टीम इंडियात (Team India) एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आजपासून सुरु होणाऱ्या मॅचमध्ये टॉसचा अत्यंत महत्व असणार आहे. टॉस जंकून पहिले फलंदाजी करणे फायद्याचे असणार आहे. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 203 धावांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर पुणेमध्ये देखील भारतीय संघाने विजय मिळवला होता. पुणेमध्ये भारताने डाव आणि 137 धावांनी विजय मिळवत मालिका खिशात घातली.

रांची येथील तिसर्‍या कसोटी सामन्यात व्हाईटवॉश मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, आफ्रिकन संघ कसोटी जिंकून भारत दौऱ्याचा शेवट गोड करू इच्छित असेल. रांची कसोटी जिंकून टीम इंडिया पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला 3-0  पराभूत करायचा प्रयत्न करेल. जुलै 2017 मध्ये श्रीलंकेविरूद्ध भारताने अखेर 3-0 कसोटी मालिका जिंकली होती. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने आतापर्यंत आशियामध्ये नऊ वेळा नाणेफेक गमावली आहे. आणि म्हणून रांची कसोटीत दुसर्‍या खेळाडूला नाणेफेकसाठी पाठवणार असल्याचे फाफ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

असा आहे भारत-दक्षिण आफ्रिका संघ:

भारत: विराट कोहली (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, उमेश यादव आणि शाहबाझ नदीम.

दक्षिण आफ्रिका: डीन एल्गार, फॅड डु प्लेसिस (कॅप्टन), टेंबा बावुमा, थेउनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लॅसेन, केशव महाराज, एडन मार्क्रम, सेनुरान मुथुसामी, लुंगी एनगीडी, एनरिच नॉर्टजे, वर्नोन फिलेंडर, डेन पीट, कगिसो रबाडा, जुबैर हमजा.