India Vs Australia 2nd Test: पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाच्या 277 धावांत 6 विकेट्स
मार्कस हॅरिस (Photo Credit : Twitter)

India Vs Australia 2nd Test:  भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दरम्यान दुसर्‍या कसोटी सामन्याला आज सकाळी सुरुवात झाली. पर्थ मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 6 विकेट गमावत 277 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचे सलामवीर फिंच आणि हॅरिस यांनी खेळाला सुरुवात केली आणि 26 ओव्हरमध्ये 66 धावा केल्या. संथ गतीने खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या चहापानापर्यंत 145 वर 3 बाद अशी झाली. बुमराह, उमेश यादव आणि हनुमा विहारी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्यानंतर पीटर हँड्सकॉम्ब 7 धावांवर बाद झाला. चौथ्या विकेटनंतर शॉन मार्शला 45 धावा करत कॅचआऊट झाला. अर्धशतक झळकावून ट्रेव्हिस हेड तंबूत परतला आणि ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का बसला.  दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, आर. अश्विन आणि रोहित शर्मा संघाबाहेर

चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने पहिला कसोटी सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तर पुढे अजून दोन सामने बाकी आहेत.