मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरू असलेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियाचा कसोटीमध्ये पराभव केला आहे. टीम इंडियाने चौथ्या दिवशी आठ गडी राखून हा विजय मिळवला आहे. पहिल्या डावात भारतीय महिला संघाने 406 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्या. टीम इंडियाकडे पहिल्या डावात 187 धावांची आघाडी होती. त्यानंतर फॉलनंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात 261 धावा केल्या. यामुळे भारताला 75 धावांचे लक्ष्य मिळालं होतं. टीम इंडियाने हे लक्ष्य दोन गडी गमावून पूर्ण करत ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला. (हेही वाचा - IND W vs AUS W 1st Test: हरमनप्रीत कौर आणि एलिसा हिली यांच्यात जोरदार वाद, पाहा व्हिडिओ)
पाहा व्हिडिओ -
𝙃𝙄𝙎𝙏𝙊𝙍𝙔 𝙄𝙉 𝙈𝙐𝙈𝘽𝘼𝙄! 🙌#TeamIndia women register their first win against Australia in Test Cricket 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/7o69J2XRwi#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/R1GKeuRa69
— BCCI Women (@BCCIWomen) December 24, 2023
स्मृती मानधनाने दुसऱ्या डावात भारताकडून सर्वाधिक नाबाद 38 धावा केल्या. रिचा अंजनाने 13 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज 12 धावांवर नाबाद राहिली. शफाली वर्माला केवळ 4 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थ आणि अॅशले गार्डनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताला पहिला विजय मिळाला आहे.