चेन्नई वनडे मॅचमध्ये किरोन पोलार्ड याने केली अशी हरकत की मैदानातच रोहित शर्मा याने म्हटले अपशब्द, पाहा Video
रोहित शर्मा आणि किरोन पोलार्ड (Photo Credit: Twitter)

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगली सुरुवात करुनही मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला. रोहितने 56 चेंडूत 36 धावा केल्या. रोहित अर्धशतक झळकावण्यात अपयशी ठरला असला तरीही त्याने डावादरम्यान काही असे केले जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. रोहित एक मस्त खेळाडू मानला जातो आणि तो खेळाडूंना मैदानावर फलंदाजीने उत्तर देतो. पण चेन्नई  (Chennai) मध्ये त्याने वेस्ट इंडीजचा कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याला शिवीगाळ केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नई येथे पहिल्या वनडे सामन्यात भारताचा उपकर्णधार रोहित आणि विंडीजचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) उप-कर्णधार पोलार्ड एकमेकांशी थट्टा करताना दिसले. (IND vs WI 1st ODI: रवींद्र जडेजा याच्या रन-आऊटवर झाला विवाद; अंपायरवर भडकले विराट कोहली आणि किरोन पोलार्ड, पाहा Run-Out चा हा व्हिडिओ)

शर्मा आणि पोलार्डचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर व्हायरल झाला आहे. यात रोहित पोलार्डला, “हा ब...द आहे,” असे म्हणताना स्टम्प माइकवर बोलताना ऐकू येत आहे. शर्मा आणि पोलार्ड हे मागील काही वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे आणि एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी शर्मा आणि पोलार्ड दोघांनीही मुख्य ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या जाहिरातीमध्ये “अनफ्रेंडशिप डे” साजरा केला. भारतीय डावातील 7 व्या षटकात वेस्ट इंडीजचा कर्णधार पोलार्डने नॉन-स्ट्राइकवर रोहितकडे येऊन त्याच्या जवळ उभा राहिला आणि त्याला काहीतरी बोलू लागला. पोलार्डने विचित्रपणे आपले शरीर हलविले आणि तो तेथून निघून गेला. यानंतर, रोहितने पोलार्डला मजेमध्ये शिवीगाळ केली आणि त्यांच्यात कोणताही वाद झाला नाही. पाहा या घटनेचा हा व्हिडिओ:

सामन्यातील कामगिरीबद्दल बोलताना रोहितने चेन्नईच्या कठीण खेळपट्टीवर चांगली सुरुवात केली. 7 व्या षटकात टीम इंडियाने केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या विकेट गमावल्या, रोहितने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सह टीम इंडियाचा स्कोर पुढे नेला. तिसर्‍या विकेटसाठी दोघांनी महत्त्वपूर्ण 55 धावांची भागीदारी केली. मात्र, चांगली सुरुवात झाल्यानंतर रोहित अलझारी जोसेफ याच्या चेंडूवर पोलार्डकडे झेलबाद झाला.