IND vs WI 3rd T20I: किरोन पोलार्ड याचा टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय; मोहम्मद शमी, कुलदीप यादव चा भारताच्या Playing XI मध्ये समावेश
विराट कोहली आणि केसरीक विल्यम्स (Photo Credits : Getty Images)

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात निर्णायक महासंग्राम होणार आहे. दोन्ही संघांमधील शेवटचा टी-20 सामना लवकरच सुरू होईल. या निर्णायक सामन्यात टॉस जिंकून विंडीज कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याने पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना जिंकेल तो मालिकेचा विजेताही ठरेल, कारण दोन्ही संघांनी पहिल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने 1-1 ने बरोबरीत राहिले आहेत. या मॅचसाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहे. मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांना प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहात, तर रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहल यांना बाहेर करण्यात आले आहे. दुसरीकडे, विंडीज संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही आहे. दोन्ही संघांमधील अंतिम सामन्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल.

दुसर्‍या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज विशेषत: मोठ्या नावांनी सर्वाधिक निराश केले. रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांनी फलंदाजीत खराब प्रदर्शन केले, शिवाय गोलंदाजही काही खास करू शकले नाही. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने कर्णधार विराट कोहली याच्या नाबाद 94 धावांच्या मदतीने इंडिजवर 6 विकेट्स राखून विजय मिळविला, तर वेस्ट इंडीजने दुसर्‍या टी-20 सामन्यात भारताला 8 विकेटने पराभूत करत मालिकेत बरोबरी साधली होती.

असा आहे भारत-विंडीजचा प्लेयिंग इलेव्हन:

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप चहल आणि दीपक चाहर.

विंडीज: किरोन पोलार्ड (कॅप्टन), निकोलस पूरन (विकेटकीपर), शेल्डन कोटरेल, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, एव्हिन लुईस, खारी पियरे, शेरफेन रदरफोर्ड, लेंडल सिमंस, केसरीक विल्यम्स, हेडन वाल्श जूनियर.