IND vs WI 2nd T20I: किरोन पोलार्ड याने जिंकला टॉस, पहिले बॉलिंगचा निर्णय; पाहा कसा आहे टीम इंडियाचा Playing XI
किरोन पोलार्ड आणि विराट कोहली (Photo Credits: Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील दुसरा टी-20 सामना लवकरच तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होईल. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. करो-या-मरोच्या मॅचमध्ये टॉस जिंकून विंडीज कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याने पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात (Indian Team) कोणताही बदल नाही करण्यात आला आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिज संघात एक बदल झाला आहे. निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने पुनरागमन केले असून दिनेश रामदिन (Denesh Ramdin) याला विश्रांती देण्यात आली आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप खास आहे कारण विजयामुळे टीम इंडिया अजून एका मालिका विजयाची नोंद करेल, तर वेस्ट इंडिजला आणखी एका पराभवाला सामोरे जावेत लागेल. यंदाच्या वर्षी वेस्ट इंडिजचा 10 टी-20 पैकी 9 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. हा सामना भारतासाठी सोपा ठरणार नाही कारण वेस्ट इंडीजने मालिकेच्या पहिल्या सामन्यात घरच्या मैदानावर 200 हून अधिक धावा केल्या होत्या. भारताची फिल्डिंगही कमकुवत दिसली. शिवाय, गोलंदाजही प्रभाव पाडण्यात अयशस्वी राहिले होते. (IND vs WI 2nd T20I: लोकल खेळाडू संजू सॅमसन याचे तिरुअनंतपुरम विमानतळावर झाले भव्य स्वागत, पाहा Video)

भारतीय कर्णधार विराट कोहली याने एकतर्फी खेळ करत संघाला विजय मिळवून दिला होता. सलामी फलंदाज केएल राहुल याने 62 धावांची खेळी करत विराटला चांगली साथ दिली.  दुसरीकडे, विंडीजची गोलंदाजही खराब राहिली. फलंदाजांनी उभारलेली मोठी धावसंख्येचा बचाव करण्यात विंडीज गोलंदाज अपयशी राहिले. एव्हिन लुईस आणि शिमरोन हेटमेयर यांनी सर्वाधिक धावा केल्या. कर्णधार किरोन पोलार्ड याने 37, तर जेसन होल्डर याने 24 धावांचे योगदान दिले होते. भारत आणि विंडीज संघात मागील 13 महिन्यात 6 टी-20 सामने झाले आहेत आणि यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे.

असा आहे भारत आणि वेस्ट इंडिजचा प्लेयिंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि दीपक चाहर.

वेस्ट इंडिज: लेंडल सिमंस, एव्हिन लुईस, शिमरोन हेटमायर, ब्रॅंडन किंग, किरोन पोलार्ड (कॅप्टन), निकोलस पूरन (विकेटकीपर), जेसन होल्डर, हेडन वाल्श जूनियर, केसरीक विल्यम्स, खारी पिय आणि शेल्डन कॉटरेल.