IND vs WI 2022: टीम इंडियाला बसला जोरदार झटका; विंडीजविरुद्ध T20 मालिकेतून KL Rahul आणि अक्षर पटेल आऊट, ‘या’ दोघांचा झाला समावेश
केएल राहुल, अक्षर पटेल (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs WI T20I 2022: टीम इंडिया (Team India) फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आणि अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) आगामी टी-20 मालिकेतून बाहेर पडले आहेत. या दोन खेळाडूंच्या जागी रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि दीपक हुडा (Deepak Hooda) यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. 9 फेब्रुवारीला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना राहुलला दुखापत झाली. त्याला हॅमस्ट्रिंगचा ताण आला होता, तर अक्षरने अलीकडेच COVID-19 मधून बरे झाल्यानंतर त्याच्या पुनर्वसनाचा अंतिम टप्पा पुन्हा सुरू केला. दुखापतीच्या पुढील व्यवस्थापनासाठी तो आता बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) जातील. उल्लेखनीय म्हणजे, वैयक्तिक कारणांमुळे पहिला एकदिवसीय सामना गमावल्यानंतर राहुल बुधवारी अहमदाबादमध्ये एकदिवसीय संघात परतला होता. तर न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौर्‍याला मुकल्यानंतर अक्षर पटेल पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. (IND vs WI T20I 2022: भारताविरुद्ध असा आहे वेस्ट इंडिजचा टी-20 संघ, रोहितच्या ‘हिटमॅन’ आर्मीला देणार काट्याची टक्कर)

बीसीसीआयने (BCCI) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की उपकर्णधार राहुलला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला, ज्यामुळे तो टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. अक्षर पटेलने कोरोनामधून बरे झाल्यानंतर सराव सुरू केला आहे, त्यामुळे त्याला टी-20 मालिकेतूनही बाहेर ठेवण्यात आले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर IPL 2022 च्या मेगा लिलावानंतर भारत वेस्ट इंडिजविरुद्ध 3 टी-20 सामने खेळणार आहे. टी-20 मालिकेचा पहिला सामना 16 फेब्रुवारीला होणार आहे. तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 18 आणि 20 फेब्रुवारीला होणार आहे.

भारताचा टी-20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, रुतुराज गायकवाड, आणि दीपक हुडा.