IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडीजने भारतविरुद्ध 15 षटकार मारत मोडला 3 वर्षाचा जुना विक्रम, वाचा सविस्तर
File image of India vs Windies cricket match. (Photo Credits: Getty Images)

हैदराबादमध्ये टीम इंडिया (Team India) विरूद्ध पहिल्या टी -20 सामन्यात वेस्ट इंडिज (West Indies) संघाची आकर्षक फलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यात वेस्ट इंडिज फलंदाजांनी जोरदार षटकार लगावले. हैदराबादमध्ये सुरु असलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून एकूण 15 षटकार लगावले गेले. या षटकारांच्या मदतीने कॅरेबियन संघाने भारतीय भूमीवरीलआंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये शानदार विक्रम नोंदविला. या सामन्यात कॅरेबियन संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 207 धावांची मोठी धावसंख्या उभारली. भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर होता, परंतु या संघाने 3 वर्ष जुना विक्रम मोडला आणि नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हैदराबादमध्ये पहिल्या टी -20 सामन्यात वेस्ट इंडीज संघाच्या फलंदाजांनी एकूण 15 षटकार लगावले. भारताविरुद्ध टी-20 सामन्यात कोणत्याही संघाने सर्वाधिक मारलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. यापूर्वी वेस्ट इंडीजने 2016 मध्ये मुंबईत झालेल्या सामन्यात एकूण 11 षटकार लगावले होते. (IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध मॅचमध्ये केएल राहुल याची हजारी, विराट कोहली-रोहित शर्मा यांच्या 'या' क्लबमध्ये झाला शामिल)

विंडीजनंतर न्यूझीलंडने 2017 राजकोट सामन्यात 10 आणि श्रीलंकाने इंदोर सामन्यात तितकेच षटकार मारले होते. दरम्यान, आजच्या भारताविरुद्ध या सामन्यात वेस्ट इंडिज फलंदाजांनी चौकारांपेक्षा अधिक षटकार ठोकले. या सामन्यात विंडीजने एकूण 207 धावा फटकावल्या आणि त्यासाठी एकूण 11 चौकार तर15षटकार मारले. वेस्ट इंडीजकडून एव्हिन लुईस (Evin Lewis), शिमरोन हेटमेयर (Shimron Hetmyer) आणि किरोन पोलार्ड (Kieron Pollard) आत्यांनी प्रत्येकी चार षटकार ठोकले, तर जेसन होल्डर याने दोन आणि ब्रॅंडन किंग याने एका षटकार ठोकला. हेटमेयरने 41 चेंडूंत 56 धावांची सर्वाधिक खेळी केली.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 5 कॅचेस सोडले आणि त्यांची मैदानी क्षेत्ररक्षणही खूप खराब राहिले. कॅच सोडणाऱ्यांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा हेदेखील शामिल होते. दोघांनीही खूप सोप्पे झेल सोडले.