भारत आणि श्रीलंका संघातील पहिला टी-20 सामना एकही बॉल न टाकता रद्द करण्यात आला आहे. गुवाहाटीमधील हा सामना पाऊस आणि खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघातील वर्षातील पहिल्या सामन्यात टॉसनंतर पावसाळा सुरुवात झालीज, त्यानंतर काही काळ पाऊस सुरु होता आणि नंतर ग्राउंड्स मेन खेळपट्टी वळवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना वेळेत काम पूर्ण करण्यात अपयश आले. आता दोन्ही संघातील पुढील सामना 7 जानेवारीला इंदोरमध्ये खेळला जाईल. 

गुवाहाटीतील बरसपारा क्रिकेट स्टेडियमवर मुसळधार पाऊस पडल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये पाच षटकांचा सामना रंगणार आहे. काही वेळातच सामान सुरु होईल. 

गुवाहाटीतील बरसपारा क्रिकेट स्टेडियमवर पुन्हा एकदा पाऊस थांबला असून विकेट सुकवण्याचे काम सुरू आहे.

भारत आणि श्रीलंका संघातील पहिल्या टी-20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. टॉसनंतर काही वेळातच पावसाने हजेरी लावली आणि वेळेत सामना सुरू होऊ शकला नाही. आता मैदानाची पुढील तपासणी 9 वाजता केली जाईल. 

श्रीलंकाविरुद्ध गुवाहाटीमधील टी-20 सामना थोड्याच वेळात सुरु होईल. पावसामुळे व्यत्यय आल्याने सध्या अंपायर मैदानाचे निरीक्षण करत आहे आणि ग्राउंड्स मॅनने कव्हर्स हटवायला सुरुवात केली आहे. 

गुवाहाटीमध्ये पाऊस सुरु झाला आहे. यापूर्वी टॉस झाला असून विराट कोहलीने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्याने सामना सुरु होण्यास उशीर होत आहे.

श्रीलंकेच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये अँजेलो मॅथ्यूजला स्थान मिळाले आहे. असे आहे श्रीलंकेचे प्लेयिंग इलेव्हन: लसिथ मलिंगा (कॅप्टन), अविष्का फर्नांडो, दनुष्का गुणथिलाका, कुसल परेरा, ओशादा फर्नांडो, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका, इसुरु उदाना, वनिंदू हसरंगा आणि लाहिरू कुमारा. 

वॉशिंग्टन भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये गेल्या मॅचपासून तीन बदल झाले आहे. सलामी फलंदाज रोहित शर्माच्या जागी शिखर धवनला संधी मिळाली आहे. शिवाय, रवींद्र जडेजालाही प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. जसप्रीत बुमराहनेही दुखापतीतून पुनरागमन केले आहे. 

भारत आणि श्रीलंका संघातील तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला टी-20सामना गुवाहाटीच्या बरसपारा क्रिकेट स्टेडियमवर लवकरच सुरू होईल. गुवाहाटी मॅचमध्ये टॉस जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

श्रीलंके (Sri Lanka) विरुद्ध टीम इंडिया (India) रविवारपासून गुवाहाटी (Guwahati) स्टेडियममध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. नवीन वर्षात, सर्वांची नजर श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी -20 सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या कामगिरीवर असेल. पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे चार महिने बाहेर पडलेला बुमराह या भारतीय संघासाठी खूप महत्वाचा आहे आणि यंदा होणाऱ्या टी-20 विश्वचषकच्या पार्श्वभूमीवर त्याचा सावधगिरीने वापर केला जात आहे. वर्ष 2019 मध्ये, जेथे 50 षटकांच्या विश्वचषक लक्ष केंद्रित केले गेले होते, चालू वर्षात, टी-20वर सर्वांचे लक्ष असेल. गुवाहाटीच्या बरसपारा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकामधील पहिला सामना खेळला जाईल. वर्ष 2020 च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत आणि श्रीलंकेचा संघ समोरासमोर येईल. अशा परिस्थितीत दोन्ही संघ नवीन वर्षाची सुरुवात विजयासह करू पाहिलं, त्यामुळे हा सामना जोरदार रोमांचक होणार आहे. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन्ही संघात आजवर झालेल्या टी-20 सामन्यात भारतीय सांगणे वर्चस्व गाजवले आहे. श्रीलंकेपेक्षा टीम इंडिया हा एक बलाढ्य संघ आहे आणि या मालिकेचा दावेदारही यात काही शंका नाही. त्यांच्या अखेरच्या टी-20 मालिकेत भारताने वेस्ट इंडीजचा पराभव केला होता, तर श्रीलंकेने त्यांच्या शेवटच्या टी-20 मालिकेत पाकिस्तानला पराभूत केले होते, पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत श्रीलंकेचा संघही विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

असा आहे भारत-श्रीलंका संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सैमसन, रिषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.

श्रीलंका: लसिथ मलिंगा (कॅप्टन), कुसल परेरा, दनुष्का गुणथिलाका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, ओशदा फर्नांडो, दासुन शनाका, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, वनिंदू हसरंगा, लक्षन संदकन, धनंजया डी सिल्वा, लाहिरू कुमारा, इसुरु उदाना.