IND vs SA 3rd Test Day 3: गोलंदाजांनी वाढवल्या दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी, Lunch पर्यंत अर्धा संघ 129 धावांवर तंबूत
भारतीय संघ (Photo CreditL IANS)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील अंतिम सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशीचा लंच झाला आहे. आणि भारतीय गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत आफ्रिकी फलंदाजांवर आपले वर्चस्व बनवून ठेवले आहे. लंच होई पर्यंत अर्धा आफ्रिका संघ 129 धावांवर माघारी परतला. यासह भारताला 368 धावांची आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या दिवशी आफ्रिकासाठी झुबैर हमजा (Zubayr Hamza) याने सर्वाधिक 62 धावा केल्या. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत भारताने पहिल्या डावात 497 धावा केल्या. भारताने पहिला डाव दुसऱ्या दिवशी चहाच्या नंतर घोषित केला. त्याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकी संघाने 9 धावांवर 2 विकेट गमावली होती. त्याच्यानंतर खराब प्रकाशामुळे आणि नंतर पावसामुळे दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा झुबैर हमजा आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस खेळत होते. पण, सुरुवातीलाच उमेश यादव (Umesh Yadav) याने भारताला  मोठी सफलता मिळवून दिली आणिडू प्लेसिसला माघारी धाडले. डू प्लेसिसने 1 धाव केली. (IND vs SA 3rd Test: डॉन ब्रॅडमन यांचा 71 वर्ष जुना रेकॉर्ड मोडत 'हिटमॅन' रोहित शर्मा याने केली नवीन विक्रमाची नोंद, जाणून घ्या)

याच्यानंतर, हमजाने उपकर्णधार टेंबा बावुमा याच्यासोबत संघाचा डाव सावरला आणि संघाने 100 धावांचा टप्पा गाठला.बावुमा आणि हमझाची भागीदारी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना रवींद्र जडेजा यानेबावुमाला बोल्ड केले आणि त्यांची भागीदारी मोडली. त्याच्यानंतर फलंदाजांची बाद होण्याचे सत्र सुरूच राहीले. यादरम्यान, भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहबाझ नदीम याला बावूमाची बहुमूल्य विकेट मिळाली. बावूमा 32 धावांवर बाद झाला.

टीम इंडियाने पहिला डाव 497 धावांवर घोषित केला. भारताकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 212 धावा केल्या, तर अजिंक्य रहाणे याने 115 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. रवींद्र जडेजा याने 51 आणि उमेश यादव ने 31 धावा केल्या. दुसरीकडे, आफ्रिकाकडून जॉर्ज लिंडे याने सर्वाधिक 4 गडी बाद केले, कगिसो रबाडा याने 3, एनरिच नॉर्टजे आणि डीन पीट यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.