IND vs SA 3rd T20I: शिखर धवन फ्लाईटमध्ये झोपेत करत होता शायरीचा सराव, रोहित शर्मा ने व्हिडिओ शेअर करत उडवली खिल्ली
रोहित शर्मा आणि शिखर धवन (AP/PTI Photo)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ यंदाच्या टी-20 मालिकेत तिसऱ्या आणि अंतिम वेळा आमने-सामने येण्यास सज्ज आहे. दोन्ही संघातील निर्णायक टी-20 मॅच रविवारी, 22 सप्टेंबरला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. याआधी भारतीय संघाची सलामीची जोडी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा फ्लाईटमध्ये मस्ती करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. या मॅचमध्ये टीम इंडिया विजय मिळवत क्लीन-स्वीप करण्याच्या निर्धारित असेल तर दक्षिण आफ्रिकी संघ मालिका वाचवण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघ बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत आणि मॅचसाठी तयारीला देखील लागले आहेत. (IND vs SA 2019: रोहित शर्मा याच्या लाडक्या लेकीच्या खेळण्यांसोबत शिखर धवन, रवींद्र जडेजा ची धमाल कॅमेऱ्यात कैद, Video)

रोहितने नुकताच बंगळुरूला जाताना फ्लाईटमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने सलामीचा साठी शिखर धवन याला झोपेत स्वतःशी बडबडताना कॅप्चर केले. या व्हिडिओमध्ये, सर्वत्र अंधार पाहायाला मिळतोय, रोहितने फोनचा कॅमेरा धवनकडे वळवला आणि नंतर शिखरला स्वतःशी बोलताना पहिले जाऊ शकते. हा आहे रोहितने शेअर केलेला व्हिडिओ:

रोहितने शेअर केलेल्या व्हिडिओवर धवनने आपली प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की तो शायरीचा सराव करत होता. शिखरने लिहिले, "मी शायरीचा सराव करत होतो आणि यांनीं व्हिडिओ घेतला. मनापासून आठवत होतो, वाह मजा आली. इतक्या मनापासून अभ्यास देखील केला असता."

दुसरीकडे, याआधी जेव्हा संघ तिसर्‍या टी-20 मॅचसाठी बेंगळुरूला जात असताना, धवनने विमानात रोहित आणि रवींद्र जडेजा याचा मस्ती करतानाच व्हिडिओ बनविला. रोहितने लेक समयारसाठी घेतलेली खेळणी बॅगेत ठेवत होता. धवनने याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, आमच्या टीमचे प्रेमळ आणि काळजी घेणारे वडील रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा.