Live Streaming of IND vs SA, 3rd T20I Match: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
विराट कोहली आणि क्विंटन डी कॉक (Photo Credits: Getty Images)

कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ (Indian Team) रविवारी, 22 सप्टेंबर रोजी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम (M Chinnaswamy Stadium) वर झालेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. धर्मशाळेतिल पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर, दुसर्‍या सामन्यात गोलंदाजांच्या आणि कोहलीच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर भारताने सात विकेट्सने मॅच जिंकत 1-0 अशी आघाडी मिळवली. आता आज होणाऱ्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला (South Africa) पुन्हा पराभूत करत मालिका खिशात घालण्याच्या निर्धारित टीम इंडिया असेल. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या अनुपस्थितीत दीपक चाहर आणि नवदीप सैनी या वेगवान गोलंदाजांनी नियमितपणे उत्तम कामगिरी केल्याबद्दल भारतीय संघ व्यवस्थापन मात्र समाधानी आहे. (IND vs SA 3rd T20I: बेंगळुरूमध्ये पाऊस आणणार व्यत्यय? जाणून घ्या कसे असेल हवामान)

तिसऱ्या टी-20 मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. यात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि एचडी चॅनेलवर सामना पाहता येईल. शिवाय, लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. शिवाय, जर तुम्ही Jio ग्राहक असाल आणि तुमच्याकडे Jio TV हे अॅप असेल तर तुम्ही फोनवर हा सामना मोफत पाहू शकता.

भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील तिसरी माची एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळली जाईल. या मैदानावर टीम इंडियाने आजवर जितके सामने जिंकले आहेत तितकेच गमावलेदेखील आहेत. आजवर या मैदानावर चार टी-20 सामने खेळले असून दोनमध्ये विजय तर दोनमध्ये पराभव पत्करावा लागला होता.

टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, क्रुणाल पांड्या, वॉशिंगटन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर आणि नवदीप सैनी.

दक्षिण अफ्रीका: क्विंटन डी कॉक (कॅप्टन), रस्सी व्हॅन डर ड्यूसेन (उपकर्णधार), टेंबा बावुमा, जुनिअर डाला, बोर्न फॉर्चून, ब्यूरेन हेंड्रिक्स, रीजा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, अ‍ॅरिच नॉर्टजे, एंडिले फेलुक्वायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शमसी आणि जॉर्ज लिंडे.