IND vs SA 2nd Test Day 1: दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात रोहित शर्मा Fail, सोशल मीडियावर यूजर्सने केले मजेदार Tweets
रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पुण्यात खेळल्या जाणार्‍या या सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. अष्टपैलू हनुमा विहारी याच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादव याचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतासाठी डावाची सुरुवात मागील मॅचप्रमाणे मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी केली. तर, दक्षिण आफ्रिकी संघाने वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि वर्नोन फिलेंडर यांनी नवीन चेंडूंसह आक्रमक गोलंदाजीची सुरुवात केली. यामुळे, मयंक आणि रोहितला वेगाने धावा करण्यात यश मिळाले नाही. दरम्यान, 25 धावांवर भारताला मोठा धक्का बसला. पहिल्या मॅचमध्ये दोन्ही डावात शतक करणारा रोहित यंदा फक्त 14 धावाच करू शकला.

कगिसो रबाडाने आफ्रिकेला चांगली सुरुवात करून देत रोहितला स्वस्तात माघारी धाडले. रोहितने मागील सामन्याच्या दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. त्यामुळे, विरोधी संघाची डोकेदुखी वाढली होती. रोहित आणि मयंक यांच्यात पहिल्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी झाली. रोहितच्या या निराशजनक फलंदाजीमुळे एकीकडे त्याचे चाहते निराश झाले आहे तर अन्य सोशल मीडियावर मजेदार पोस्ट शेअर करत  मजा घेताहेत. पहा सोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रतिक्रिया:

रोहित शर्माला प्रत्येक वेळी ग्रीन पिच म्हणते

जेव्हा बॉल स्विंग होतो

रोहित शर्माला हिरवी खेळपट्टी हवी होती, त्यामुळे खेळपट्टीच्या क्युरेटरने त्याला काही हरित खेळपट्टी करून दिली परंतु तो टिकू शकला नाही

आरेच्या निषेधार्थ आंदोलनात सामील होण्यासाठी रोहित शर्मा लवकर आऊट झाला 

रोहित शर्मा 1 मॅच शानदार खेळल्यानंतर 2 मॅच खराब खेळणारच

आजपासून सुरु झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये एकीकडे टीम इंडिया विजय मिळवत अजून एक मालिका जिंकण्याच्या निर्धारित असेल, तर दुसरीकडे आफ्रिकी संघ मालिकेत 1-1 ने बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी, विशाखापट्टणममध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने 203 धावानी विजय मिळवला. रोहितने पहिल्या मॅचच्या दोन्ही डावांमध्ये शतक केले होते. मयंकने त्याला शानदार साथ दिली आणि पहिल्या डावात दुहेरी शतक केले. गोलंदाजांनीदेखील चांगली खेळी केली. रविचंद्रन अश्विन याने पहिल्या डावात 7 तर मोहम्मद शमी याने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या.