IND vs SA 2020: हार्दिक पांड्या ने वनडे मालिकेआधी दक्षिण अफ्रिका टीमला दिली चेतावणी, सरावा दरम्यान खेळला जबरदस्त शॉट (Video)

भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचा अनेक महिन्यानंतर संघात पुनरागमन झाले आहे. मालिका सुरु होण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे.

सराव सत्रात हार्दिक पंड्या (Photo Credits: @BCCI/Twitter)

न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत लज्जास्पद पराभवानंतर भारतीय टीमसमोर (Indian Team) आता दक्षिण अफ्रिकेचे (South Africa) आव्हान आहे. अफ्रिकी संघ 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतात येत आहे. भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याचा अनेक महिन्यानंतर संघात पुनरागमन झाले आहे. जर हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त असेल आणि त्याने संघात उत्कृष्ट फॉर्म दर्शविला तर तो टीमसाठी महत्वाचा अष्टपैलू म्हणून सिद्ध होऊ शकतो. मालिका सुरु होण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. भारत-दक्षिण अफ्रिकामधील पहिली वनडे धर्मशाला (Dharamshala) मध्ये खेळली जाईल. पहिल्या सामन्याआधी बीसीसीआयने (BCCI) हार्दिकचा नेट्समध्ये सराव करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो एक उत्तम शॉट मारताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे आणि त्याच्या पुनरागमनामुळे चाहतेही खूप खुश आहेत. (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन यांना संधी)

यापूर्वी हार्दिकची डीवाय पाटील टी-20 कपमध्ये उत्तम कामगिरी केली होती. त्याने शतक जडण्याऐवजी एका सामन्यात 5 विकेटही घेतल्या होत्या. अशा स्थितीत तो दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिकेतही चांगला फॉर्म कायम ठेवेल अशी अपेक्षा केली जात आहे. वनडे मालिकेपूर्वी हार्दिकच्या सरावा दरम्यानचा व्हिडिओ पाहा:

दरम्यान, हार्दिकला काही महिन्यांपूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागली होती. गेल्या काही दिवसांपासून तो बंगळुरू स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सातत्याने फिट होण्याचे प्रयत्न करत होता. न्यूझीलंड दौर्‍यासाठीही त्याने फिट होण्याचा प्रयत्न केला पण तो फिट होऊ शकला नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हार्दिकने आपला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. आता टीम इंडियाचा पहिला सामना 12 मार्च रोजी धर्मशालामध्ये होणार आहे, दुसरा सामना 15 मार्चला लखनौ आणि तिसरा सामना कोलकाता येथे 18 मार्च रोजी होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif