IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रोहित शर्मा याने केले सलग दुसरे टेस्ट शतक, Netizens ने Memes द्वारे केले स्वागत
रोहित शर्मा (Photo Credits: BCCI-Twitter)

भारतीय सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या टेस्ट मालिकेच्या पहिल्या सामन्यात दोन्ही डावात शतक झळकावले. यासह टीम इंडियाच्या हिटमॅनने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. रोहितने 149 चेंडूत 10 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 127 धावा फटकावल्या. या सामन्याच्या पहिल्या डावात रोहितच्या फलंदाजीला 176 धावा आल्या. टीमसाठी पहिल्यांदा सलामीला येत रोहितने सुरुवातीपासून आक्रमकता दाखवली आणि मोठा स्कोर केला. आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या डावात रोहितने डीन पीट याच्या ओव्हरमधील शेवटच्या तीन चेंडूंमध्ये तीन षटकार ठोकले. रोहितचा शानदार डाव केशव महाराज याने संपुष्टात आणला. महाराजच्या चेंडूवर रोहित स्टंप आऊट झाला. रोहितने 149 चेंडूत 127 धावा केल्या, या खेळीत त्याने 10 चौकार आणि सात षटकार ठोकले आहेत. (IND vs SA 1st Test Day 4: रोहित शर्मा याचे सलामीला येत दुसरे शतक, 'हे' 3 रेकॉर्ड करत रचला इतिहास)

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रोहितच्या या दोन्ही खेळी त्याच्यासह त्याच्या चाहत्यांसाठी देखील खास होती. मर्यादित षटकारांचा सलामीवीर रोहित पहिल्यांदा टेस्टमध्ये डावाची सुरुवात करायला आला होता. रोहितने यंदाच्या मॅचमध्ये दुसरे शतक करत चाहते देखील फॉर्ममध्ये आले आणि मिम्सद्वारे आपला आनंद व्यक्त करू लागले.

रोहित शर्माचे चाहते कोहलिटर्डसवर कॉल करीत आहेत

रोहित शर्मा

रोहित शर्मा त्याच्या टीकाकारांना

रवी शास्त्री आणि रोहित शर्माची भागीदारी:

वनडे आणि टी-20 मध्ये भारतासाठी डावाची सुरुवात करणाऱ्या रोहितले पहिल्यांदा टेस्टमध्ये सलामीला फलंदाजी करायची संधी मिळाली. केएल राहुल याच्या सतत अपयशामुळे रोहितला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली.