IND vs SA 1st Test Day 4: Lunch पर्यंत भारताला 106 धावांची आघाडी, मयांक अग्रवाल स्वस्तात बाद
रोहती शर्मा, मयंक अग्रवाल (Photo Credits: BCCI-Twitter)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात आज विशाखापट्टनमच्या एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याचा चौथा दिवस खेळला जात आहे. पहिल्या डावाप्रमाणेच रोहित शर्मा दुसऱ्या डावातदेखील खूप वेगवान फलंदाजी करीत आहे. 13 ओव्हर्सनंतर भारताने 32 धावा केल्या आहेत. या सामन्यात दक्षिण आफ्रिकी संघ लंचपर्यंत 431 धावांवर ऑल आऊट झाला. आणि भारताकडे लंचपर्यंत 106 धावांची आघाडी आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला धक्का बसला. पहिल्या डावात दुहेरी शतक करणारा मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) 7 धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकासाठी पहिल्या डावात सलामीवीर डीन एल्गार आणि यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक यांनी शानदार शतक ठोकले. कर्णधार फाफ डु प्लेसिस यानेही अर्धशतक ठोकले. भारताकडून फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने पहिल्या डावात सर्वाधिक 7 विकेट घेतल्या.

भारताला दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का देत केशव महाराज (Keshav Maharaj) याने सलामीवीर मयंकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुसर्‍या डावातही भारताने संथ सुरुवात केली. रोहित आणि मयंक ने सात ओव्हरनंतर कोणत्याही फक्त 16 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी आफ्रिकेने आठ गडी गमावत 385 धावांनी सुरुवात केली. संघाने स्कोरमध्ये 46 धावा अजून जोडल्या आणि लंचच्या आधी संपूर्ण संघ बाद झाला. सेनुरन मुथुसामी 33 धावांवर नाबाद होता. टीमसाठी एल्गारने सर्वाधिक 160 धावा केल्या. त्याने 287 चेंडूंचा सामना करत 18 चौकार आणि चार षटकार ठोकले. डी कॉकने 163 चेंडूंत 16 चौकार आणि दोन षटकारांसह 111 धावा केल्या.

दरम्यान, टीम इंडियाने त्यांचा पहिला डाव 502 धावांवर घोषित केला होता. भारतासाठी रोहितने दीडशे धावा केल्या होत्या तर मयंकने टेस्टमधील त्याचे पहिले दुहेरी शतक केले. भारताकडून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने सात गडी बाद केले. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने दोन आणि ईशांत शर्माला एक विकेट मिळाली.