IND vs SA 1st ODI: 71 व्या शतकाची प्रतीक्षा संपणार का? नेतृत्वाच्या ओझ्यातून बाहेर पडून Virat Kohli आज आपल्या नावे करू शकणार ‘हे’ 4 भीम पराक्रम
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st ODI 2022: विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय संघाच्या (Indian Team) सर्व फॉरमॅटमधून नेतृत्वाचा राजीमाना दिल्यावर आता टीम इंडियाच्या (Team India) एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार 2017 नंतर प्रथमच फक्त फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. डिसेंबर 2014 मध्ये विराट पहिले कसोटी कर्णधार झाला, तर जानेवारी 2017 मध्ये त्याने वनडे आणि टी-20 संघांची कमान सांभाळली. आता विराटच्या डोक्यावरून कर्णधारपदाचे मोठे ओझे उतरले आहे, अशा परिस्थितीत विराटच्या बॅटमधून आता झटपट धावा निघतील आणि 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रदीर्घ प्रतीक्षाही संपुष्टात येईल, अशी आशा चाहत्यांना आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या वनडे सामन्यात विराटचा भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला असून या सामन्यात त्याला अनेक विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असेल. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात कोहलीच्या निशाण्यावर असलेले मोठे रेकॉर्डस् खालीलप्रमाणे आहेत. (टीम इंडियाचा माजी कर्णधार Virat Kohli बाबत धक्कादायक खुलासा, 100 व्या कसोटीसाठी BCCI ने दिलेली ही खास ऑफर फेटाळली)

71 व्या शतकाचा दुष्काळ संपणार?

भारताचा दिग्गज फलंदाज आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके झळकावली असून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाँटिंगच्या खात्यात 71 आंतरराष्ट्रीय शतके आहेत, तर विराटने आतापर्यंत 70 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. या सामन्यात विराटने शतक झळकावले तर तो पाँटिंगची बरोबरी करेल, तर मालिकेदरम्यान त्याच्या बॅटने दोन शतके झळकावली तर तो दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत पॉंटिंगला मागे टाकेल.

राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांना पछाडणार

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने एकूण 2001 धावा केल्या आहेत, तर सौरव गांगुली दुसऱ्या आणि राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने 1313 धावा तर द्रविडने 1309 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीने आतापर्यंत 1287 धावा केल्या आहेत. या सामन्यात विराट 27 धावा करताच तो या दोघे दिग्गजांपुढे जाईल.

दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा

Proteas देशात भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट चौथ्या क्रमांकावर आहे. विराटच्या पुढे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडही आहेत. गांगुलीने 1048 आणि द्रविडने 930 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर 1453 धावा केल्या आहेत. विराटने आतापर्यंत 877 धावा केल्या असून या सामन्यात किंवा मालिकेत 172 धावा करताच तो गांगुली आणि द्रविड या दोघांनाही मागे टाकेल. 54 धावा करताच तो राहुल द्रविडला मागे टाकेल.

सौरव गांगुलीला मागे संधी

चार किंवा अधिक देशांमध्ये 1000 पेक्षा धावा करणारे भारतीय खेळाडू आतापर्यंत फक्त दोनच आहेत. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली. तेंडुलकरने सहा देशांमध्ये 1000+ धावा केल्या आहेत, तर सौरव गांगुलीने चार देशांमध्ये असे केले आहे. विराटने आतापर्यंत भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1000 पेक्षा एकदिवसीय धावा केल्या आहेत आणि जर त्याने या मालिकेत आणखी 113 धावा केल्या तर तो गांगुलीची बरोबरी करेल.