PHOTOS: न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, विराट कोहली ने शेअर केला फिल्डिंग प्रॅक्टिसचा फोटो
विराट कोहली (Photo Credit: Instagram)

यजमान न्यूझीलंड (New Zealand) आणि भारत (India) यांच्यात 21 फेब्रुवारीपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होईल. वनडे मालिकेत पराभूत झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) चा संघ कोणत्याही परिस्थितीत कसोटी मालिका गमावू इच्छित नसेल. यासाठी भारतीय संघ (Indian Team) मैदानावर सरावात करण्यासाठी कोणतीही कमी सोडत नाही. कोहलीने नुकतच सोशल मीडियावर 19 फेब्रुवारी म्हणजे आज, टीमसोबत वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व मैदानावर सराव करतानाच फोटो शेअर केला. कोहलीने कॅप्शनमध्ये लिहिले, "मध्यभागी चांगले सत्र". मालिका सुरु होण्यापूर्वी भारताला रोहित शर्माच्या रूपात मोठा धक्का बसला. रोहितला टी-20 च्या अंतिम सामन्यात दुखापत झाल्याने त्याला टेस्ट मालिकेला मुकावे लागले. (IND vs NZ 1st Test: विराट कोहली साठी घटक सिद्ध होऊ शकतात न्यूझीलंडचे 'हे' दोन स्टार गोलंदाज, सर्वाधिक वेळा केले आहे आऊट)

शेअर केलेल्या फोटोमध्ये विराट उपकर्णधार अजिंक्य रहाणेसोबत क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसतोय. या फोटोमध्ये रिषभ पंतही दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील महिन्यात झालेल्या वनडे मालिकेच्या एका सामन्यादरम्यान पंतला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याचा न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकारांच्या टीममध्ये समावेश करूनही खेळण्याची संधी मिळाली नाही. पंतच्या जागी मनीष पांडे आणि विकेटकीपरची जबाबदारी केएल राहुलला देण्यात आली होती. पाहा हा फोटो:

 

View this post on Instagram

 

Good session out in the middle 💪💪 #NZvIND

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

बीसीसीआयनेही सराव सत्राचे काही फोटोज शेअर केले आहेत

या दौऱ्यावरील पहिल्या झालेल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 5-0, तर वनडे मालिकेत यजमान टीमने 3-0 ने मालिका जिंकली. आणि शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या टेस्ट मालिका जिंकून टीम इंडिया आयसीसी टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये अव्वल स्थान कायम ठेवू पाहिलं, तर न्यूझीलंड विजय मिळवत गुणांमध्ये वाढ करू इच्छित असेल.