भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मधील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा सामना माउंट मौंगगुई येथे खेळला जात आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने केएल राहुल (KL Rahul) याचे शतक आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 296 धावा केल्या. दोन्ही देशांमधील आजच्या सामन्यासाठी नियमित किवी कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने दुखापतीनंतर पुनरागमन केले. पहिले फलंदाजी करत भारताकडून राहुलने 112 धावा, श्रेयस 62 आणि मनीष पांडे 42 धावा केल्या. दुसरीकडे, यजमान किवी संघाने आज सुरुवातीला गोलंदाजीने प्रभावित केले. त्यांनी मोठ्या खेळाडूंना स्वस्तात बाद केले, मात्र नंतर त्यांना नियमितपणे विकेट घेता आल्या नाही. न्यूझीलंडकडून हमीश बेनेट (Hamish Bennett) 4, काईल जैमीसन, आणि जेम्स नीशम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. (IND vs NZ 3rd ODI: विराट कोहली याची न्यूझीलंडविरुद्ध द्विपक्षीय वनडे मालिकेत खराब बॅटिंग, अपेक्षित नसलेल्या 'या' लाजिरवाण्या रेकॉर्डची केली नोंद)
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीनंतर भारतीय संघाला पहिला धक्का डावाच्या दुसर्या षटकात लागला. जैमिसनने मयंक अग्रवाल ला अवघ्या 1 धाववर बाद केले. यानंतर कर्णधार विराट कोहलीने 9 धावा केल्या आणि बॅनेटच्या चेंडूवर जैमीसनच्या हाती झेलबाद झाला. पृथ्वी शॉ च्या भारताला तिसरा धक्का बसला. 42 चेंडूत 40 धावा करून पृथ्वी धावबाद झाला. श्रेयसने 63 धावांवर बाद होण्यापूर्वी राहुलबरोबर शतकी भागीदारी केली आणि भारताचा डाव सावरला. दोंघांमधील भागीदारी महत्वाची ठरली. यानंतर राहुलने 104 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले, हे त्याच्या वनडे कारकिर्दीचे चौथे शतक ठरले. नंतर बेनेटने सलग दोन चेंडूवर राहुल आणि मनीषला पॅव्हिलिअनचा रस्ता दाखवला. शार्दूल ठाकूरने 7 धावा केल्या.
पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने यजमान न्यूझीलंडचा क्लीन स्वीप केल्यावर आता त्यांच्यावर वनडे मालिकेत त्याला क्लीन स्वीपची तलवार लटकत आहे. भारताचा टॉप ऑर्डर या सामन्याप्रमाणे मागील दोन्ही सामन्यात फ्लॉप ठरला. या सामन्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार कोहलीने बदल केला. अष्टपैलू केदार जाधवच्या जागी मनीष पांडेला संघात स्थान देण्यात आले आहे.