काईल जेमीसन (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs NZ 2nd Test: क्रिकेटपटूंवर धूर्तपणे टीका करण्यासाठी आणि ट्विटरवर मजेदार बॉलीवूड मीम्स शेअर करण्यासाठी प्रसिद्ध माजी भारतीय क्रिकेटपटू आणि ‘मिम किंग’ वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी टीम इंडियाला (Team India) मुंबई येथे दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ‘काईल जेमिसन (Kyle Jamieson) धोका’ टाळण्यासाठी एक हास्यास्पद सल्ला दिला आहे. सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय मालिकेतील भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात किवी वेगवान गोलंदाज काईल जेमीसन हा ब्लॅककॅप्सचा (Blackcaps) प्रमुख गोलंदाज होता. कानपूरमध्ये (Kanpur) खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत जेमीसनने शानदार गोलंदाजी केली होती. मुंबईतील मालिकेतील निर्णायक सामन्याच्या पूर्वसंध्येला पंजाब किंग्ज (PBKS) फ्रँचायझी फलंदाजी प्रशिक्षकाने एक मजेदार मिम शेअर केली आणि स्पष्ट केले की भारत या वेगवान गोलंदाजाला वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्यापासून रोखू शकतो. (IND vs NZ 2nd Test Weather Report: मुंबईतील अवकाळी पावसामुळे मालिकेच्या निर्णायक सामन्याच्या सुरुवातीला बसणार फटका?)

त्यांनी लिहिले, “जेमसनचा धोका टाळण्याचा एक मार्ग म्हणजे ही उंचीची मर्यादा वानखेडेबाहेर ठेवणे हा असू शकतो.” जेमीसनने पहिल्या कसोटीत वरिष्ठ वेगवान गोलंदाज टिम साउदीसह  आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर दोन्ही डावात भारतीय संघाला अडचणीत आणले होते. त्याने पहिल्या डावात सलामीवीर मयंक अग्रवाल, शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांना बाद केले होते. जेमीसनने पहिल्या डावात 91 धावा देऊन तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या, ज्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 345 धावाच करता आल्या. दरम्यान जेमीसनबद्दल जाफर यांचे ट्विट सोशल मीडियावर यूजर्समध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

कानपुर कसोटीच्या दुसऱ्या डावातही देखील जेमीसनने 40 धावांत तीन विकेट घेतल्या. यामध्ये त्याने गिल, चेतेश्वर पुजारा आणि रविचंद्रन अश्विनचा समावेश होता. जेमीसनने कानपूर कसोटीत एकूण सहा विकेट घेतल्या. दुसरीकडे, शुक्रवारपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत हा किवी गोलंदाज पुन्हा भारतासाठी धोका ठरू शकतो. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे आजपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणारा सामन्यात विजयी संघ मालिकेत बाजी मारेल.