IND vs NZ 2nd Test: अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा की..., Virat Kohli याच्यासाठी मुंबई कसोटीतुन कोण होणार आऊट?
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2nd Test 2021: भारतीय प्रशिक्षक म्हणून दुसऱ्या कसोटी सामन्यात राहुल द्रविड चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) संघात परतल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) किंवा मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळावे की नाही? याबाबत द्रविडला कठोर निर्णय घ्यावा लागेल. पहिल्या कसोटीत श्रेयस अय्यरने अनुक्रमे 105 आणि 65 धावांची शानदार खेळी खेळून भारताला अडचणीतून सावरले होते, पण संघाची गाडी विजय पथावर आणली. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढणे खूप कठीण असेल, विशेषत: जेव्हा भारताच्या पहिल्या तीन मधल्या फळीतील फलंदाजांची गेल्या दोन वर्षात केवळ 27.3 ची सरासरी आहे. अशा स्थितीत विराट कोहलीला संघात पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाकडे तीन पर्याय आहेत. (IND vs NZ 2nd Test: मुंबई टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस बनू शकतो खलनायक, वानखेडेच्या खेळपट्टीवरही परिणाम होण्याची शक्यता)

कानपुर कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व केलेल्या अजिंक्य रहाणेची शेवटच्या 16 सामन्यांमध्ये फक्त 24.39 ची सरासरी होती. त्यात एका शतकाचाही समावेश आहे. त्याची कारकिर्दीची सरासरी आता 40 पेक्षा कमी असून मायदेशातील सरासरी फक्त 35.73 आहे, जी गेल्या पाच वर्षांत फक्त 30.08 वर खाली घसरली आहे. रहाणेला वगळणे विराटला चौथ्या क्रमांकावर परतणे आणि अय्यरला कानपूर कसोटीप्रमाणेच पाचव्या क्रमांकावर जाणे हा भारतीय संघ व्यवस्थापनासाठी सर्वात सोपा पर्याय असेल. याशिवाय चेतेश्वर पुजाराने 2014-15 मध्ये मेलबर्न कसोटीत गेम-चेंजिंग खेळी केली होती पण पुढच्या सिडनी कसोटीत त्याला बाहेर बसावे लागले होते. 2015 मध्ये त्याने श्रीलंकेतील हिरव्या खेळपट्टीवर शतक झळकावले होते, परंतु घरच्या मालिकेत चांगली कामगिरी केली नाही आणि पुढील वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याला संघात स्थान मिळाले नाही. पुजाराने शतक झळकावून जवळपास तीन वर्षे झाली आहेत. यादरम्यान त्याने 23 सामन्यांत केवळ 28.61 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, कोहलीसाठी जागा करणे सलामीवीर मयंक अग्रवालवर अन्याय करण्यासारखे होईल. 15 कसोटीत त्याची सरासरी 43.28 आहे. त्याने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध द्विशतके झळकावली आहेत. तसेच परदेशात न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्मामुळे संधी मिळाली नव्हती. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर केले होते. त्यामुळे आता किवीज विरोधात एका कसोटीनंतर बाहेर बाहेर करणे त्याच्यावर अन्याय होईल. अशा स्थितीत अखेरीस विराटला स्थान देण्यासाठी अखेर कोणता खेळाडू बाहेर पडतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.