IND vs NZ 1st T20I Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंग कुठे, कसे बघता येणार? जाणून घ्या
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st T20I Live Streaming: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांची मालिका आजपासून सुरु होत आहे. रोहित शर्माच्या  (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) आणि टिम साऊदीच्या (Tim Southee) नेतृत्वात किवी संघ पहिल्या टी-20 मध्ये भिडतील. आयसीसी टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरी विसरून भारतीय संघ (Indian Team) न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम फेरीत हरल्यानंतर न्यूझीलंड पुन्हा विजयी पथावर परतण्याचा प्रयत्न करेल. किवी कर्णधार केन विल्यमसन आणि काईल जेमिसन यांनी कसोटी सामन्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मालिकेतून माघार घेतली आहे पहिल्या T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी आणि कसे पाहू शतकात ते जाणून घ्या. (IND vs NZ Series 2021: केन विल्यमसननंतर आता आणखी एक किवी स्टारची एक्झिट, T20 मालिकेत न खेळण्याचा घेतला निर्णय)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक सामन्याच्या अर्धातासपूर्वी संध्याकाळी 6.30 वाजता होईल. या सामन्यासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांना परवानगी देण्यात आली आहे. तरीही स्टेडियममध्ये जाऊन जे प्रेक्षक स्टेडियममध्ये सामना पाहू शकत नाही ते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगू आणि स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड चॅनेलवर सामन्याचा लाईव्ह आनंद लुटू शकतात. तसेच Disney + हॉटस्टार अ‍ॅपवर भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी-20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.

भारत-न्यूझीलंड संघ खालीलप्रमाणे आहेत

भारतीय संघ: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर आणि रुतुराज गायकवाड.

न्यूझीलंड संघ: टिम साऊदी (कॅप्टन), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, टिम सेफर्ट (विकेटकीपर), मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, ईश सोधी, टॉड अ‍ॅस्टल आणि अ‍ॅडम मिल्ने.