IND vs ENG Series 2021: महान क्रिकेटपटू Geoffrey Boycott यांचं मोठं विधान, 'हा' इंग्लंड क्रिकेटर मोडणार सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक टेस्ट धावांचा विक्रम!
सचिन तेंडुलकर विरुद्ध इंग्लंड 2011 (Photo Credit: Getty)

IND vs ENG Series 2021: इंग्लंडचा (England) विद्यमान कसोटी कर्णधार जो रूट (Joe Root) फक्त इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू नाही तर सचिनच्या तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) सर्वाधिक विक्रम मोडण्याची क्षमतादेखील त्याच्यात आहे, असे मत दिग्गज क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट (Geoffrey Boycott) यांनी व्यक्त केले. कारकिर्दीच्या बाकी काही वर्षात त्याला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही तर रुट तब्बल 200 कसोटी सामने खेळू शकतो आणि सचिनच्या टेस्टमधील सर्वाधिक धावांचा (Sachin Test Runs) रेकॉर्ड मोडेल असा बॉयकॉट यांचे मत आहे. 30 वर्षीय रुटने 2012 मध्ये इंग्लंडकडून पदार्पण केल्यापासून यापूर्वीच 99 कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंडच्या कर्णधाराने जवळपास 50 च्या सरासरीने 8249 धावा केल्या आहेत तर सचिनने 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावांवर कारकीर्द संपुष्टात आणली होती. नुकत्याच संपुष्टात आलेल्या श्रीलंका दौऱ्यावर इंग्लंडच्या कर्णधाराने फक्त दोन सामन्यांत 426 धावा करत सर्वांना चकित केले. (IND vs ENG Series 2021: भारत-इंग्लंड यांच्यातील या मालिकेसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या एन्ट्रीला BCCI ग्रीन सिग्नल देण्यास उत्सुक, पण एकच अडचण)

श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान, रूटने बॉयकॉट, केविन पीटरसन आणि डेविड गॉवर यांना मागे सोडले आणि इंग्लंडच्या कसोटीतील सर्व धावा नोंदवल्या. केवळ ग्रॅहम गूच (8900) अ‍ॅलिस्टर कुक (12,472) यांनी रूटपेक्षा अधिक कसोटी धावा केल्या आहेत. “इंग्लंडकडून डेविड गॉवर, केविन पीटरसन आणि स्वत:च्या तुलनेत फक्त कसोटी धावा केल्याचे विसरून जा. जो रुटमध्ये 200 टेस्ट खेळण्याची आणि सचिन तेंडुलकरपेक्षाही जास्त धावा करण्याची क्षमता आहे,” बॉयकॉट यांनी 'द टेलीग्राफ' मध्ये लिहिले. “रूट फक्त 30 वर्षांचा आहे. त्याने आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले आहेत आणि 8249 धावा केल्या आहेत. जोपर्यंत त्याला गंभीर दुखापत होत नाही तोपर्यंत सचिन तेंडुलकरच्या 15,921 धावांच्या पार जाऊ शकत नाही, असे कोणतेही कारण नाही,” बॉयकॉट यांनी पुढे म्हटले. दरम्यान, प्रत्येक खेळाडू त्यांच्या वातावरणाप्रमाणे खेळत असून त्यांनी रुटची भूतकाळातील महान खेळाडूंशी तुलना करणे अन्यायकारक असल्याचं म्हटलं.

दुसरीकडे, श्रीलंका दौऱ्यावर रूटने इंग्लंडच्या 2-0 विजयात महत्वाची भूमिका बजावली. रूटने चार डावांमध्ये 106.50 च्या सरासरीने दोन शतकांसह 426 धावा काढल्या. दौऱ्यावर 228 रूटची सर्वोच्च धावसंख्या ठरली. आता संघ भारत दौऱ्यासाठी रवाना होईल जिथे 5 फेब्रुवारीपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.