IND vs ENG: कोरोनाने Ravi Shastri आणि टीम इंडियात आणला दुरावा, ओव्हलनंतर मँचेस्टर टेस्ट सामन्यातून पडले बाहेर

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री RTPCR चाचणीत कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे आणि ते पुढील दहा दिवस आयसोलेट राहतील. ज्यामुळे इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये पाचवी ते आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. 59 वर्षीय शास्त्री रविवारी झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये सकारात्मक आढळले होते. सोमवारी त्यांच्या आरटी पीसीआर चाचणी अहवालात संक्रमणाची पुष्टी झाली आहे.

विराट कोहली, रवि शास्त्री (Photo Credit: Getty)

भारताचे (India) मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) RTPCR चाचणीत कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे आणि ते पुढील दहा दिवस आयसोलेट राहतील. ज्यामुळे इंग्लंडविरुद्ध (England) मँचेस्टरमध्ये (Manchester) पाचवी आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. 59 वर्षीय शास्त्री रविवारी झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये सकारात्मक आढळले होते. सोमवारी त्यांच्या आरटी पीसीआर चाचणी अहवालात संक्रमणाची पुष्टी झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 10 सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले, “दोन रॅपिड अँटीजन चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शास्त्री आरटी पीसीआर चाचणीमध्येही सकारात्मक आढळले आहेत. त्यांचा घसा खवल्यासारखी सौम्य लक्षणे आहेत. ते दहा दिवस अलगावमध्ये असतील.” अशा स्थितीत त्यांच्या जवळच्या संपर्कात आलेले सपोर्ट स्टाफचे तीन सदस्य, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल हे देखील विलगीकरणात आहेत.

शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी झालेल्या दोन रॅपिड अँटीजन चाचण्यांमध्ये टीमचे सदस्य निगेटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, सहाय्यक कर्मचारी आणि सर्व खेळाडूंना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. टीम हॉटेलमध्ये त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी शास्त्रींना संसर्ग झाल्याची शक्यता आहे कारण त्यात बाहेरचे पाहुणेही सामील झाले होते. पटेल, श्रीधर आणि अरुणही त्यात उपस्थित होते. शास्त्री पहिले लेटरल फ्लो चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले होते. ब्रिटनच्या कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर कोणाची आरटी-पीसीआर चाचणी सकारात्मक आली, तर त्याला व्यक्तीला किमान 10 दिवस अलगावमध्ये राहावे लागेल, तर जवळच्या संपर्कात आलेल्यांना देखील समान कालावधीसाठी क्वारंटाईन केले जाईल.

भारत आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यात सध्या 1-1 ने बरोबरी आहे. या मालिकेतील नॉटिंगहम येथील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यानंतर लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला पराभूत करत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. आता दोन्ही संघ चौथ्या कसोटी सामन्यात आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारताने दुसऱ्या डावात 466 धावांचा डोंगर उभारला आणि इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now