IND vs ENG 3rd Test: लीड्स कसोटीत इंग्लंड प्रेक्षकांचा उर्मटपणा, टिंगल करणाऱ्या इंग्लिश चाहत्यांना Mohammed Siraj ने दिली अशी रिअक्शन (Watch Video)
मोहम्मद सिराज (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 3rd Test: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात लीड्स (Leeds) येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लिश प्रेक्षकांचं उर्मटपणा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. नॉटिंगहम येथील पहिला टेस्ट सामना ड्रॉ झाल्यावर भारतीय संघाने (Indian Team) मनोरंजक लॉर्ड्स कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली. आता मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लिश गोलंदाजांनी धमाकेदार कमबॅक करून भारतीय संघाला पहिल्या डावात 78 धावांवर रोखले. भारताचा एकही फलंदाज इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे तग धरू शकला नाही. रोहित शर्माने 19 धावा केल्या तर अजिंक्य रहाणेने 18 धावा काढल्या. यांनतर इंग्लंडकडून रोरी बर्न्स आणि हसीब हमीदची नवीन जोडी सलामीला उतरली. यानंतर फलंदाजांप्रमाणे भारतीय गोलंदाज दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी इंग्लिश सलामी जोडी मोडण्यात अपयशी ठरले. यामुळे भारतीय खेळाडू स्टेडियमवर उपस्थित इंग्लंड चाहत्यांच्या निशाण्यावर आले विशेषतः मोहम्मद सिराज. (IND vs ENG 3rd Test Day 1: इंग्लंड सलामीवीरांची धडाकेबाज सुरुवात, दिवसाखेर बिनबाद केल्या 120 धावा; भारताला पहिल्या विकेटची प्रतीक्षा)

इंग्लंडच्या डावात भारताचा युवा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत होता. भारतीय संघाच्या लॉर्ड्स टेस्ट विजयाचा मुख्य नायक ठरलेला सिराज तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड सलामी जोडीवर दबाव आणण्यात अपयशी ठरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सिराजने 7 ओव्हर गोलंदाजी करत 26 धावा दिल्या पण त्याला एकही विकेट मिळाली. अन्य टीम इंडिया गोलंदाजांप्रमाणे सिराजने लयीत गोलंदाजी करण्यात फेल झाला. या दरम्यान पहिल्या दिवसाचे काही ओव्हर शिल्लक असताना बाउंड्री लाईनवर फिल्डिंगसाठी जात असताना इंग्लंड चाहत्यांनी सिराजची टिंगल केली. प्रत्युत्तरात सिराज देखील प्रतिक्रिया देण्यापासून मागे राहिला नाही आणि त्याने 1-0 असा इशारा करून मालिकेचा स्कोर सांगून उर्मट इंग्लिश चाहत्याना चोख प्रत्युत्तर देत बोलती बंद केली.

दुसरीकडे, इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ बुधवारी पहिल्या डावात केवळ 78 धावांवर ढेर झाला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटनने यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम कुरन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. भारतीय संघ सध्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.