IND vs ENG 3rd Test: ‘आम्ही आमचा धडा शिकलो’! ‘विराट ब्रिगेड’ला घाबरला इंग्लंड कर्णधार जो रूट, आता नाही अडकणार टीम इंडियाच्या जाळ्यात
इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test 2021: लॉर्ड्सवर (Lords) दुसऱ्या कसोटीत भारताविरुद्ध (India) 151 धावांनी झालेल्या पराभवानंतर, इंग्लंडचा कर्णधार जो रूटने (Joe Root) शब्द दिला आहे की त्याचा संघ भारतासोबत शाब्दिक भांडणात अडकणार नाही. लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्यात भारताने त्यांच्या आक्रमकतेचा उपयुक्त वापर करून अविस्मरणीय विजय नोंदवला, तर इंग्लंडचा (England) संघ भारतीय खेळाडूंना वारंवार प्रयत्न करूनही अडचणीत आणण्यात अपयशी ठरला. इंग्लिश कर्णधार रूटला बुधवारी हेडिंग्ले (Headingley) येथे सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत अशी परिस्थिती टाळायची आहे. इंग्लंड विरुद्ध भारत लॉर्ड्स कसोटी सामना तणावाने भरपूर राहिला. दोन्ही संघाच्या खेळाडू एकमेकांवर पलटवार करत राहिले पण अखेर भारतीय खेळाडूंनी बाजी मारली. भारत मालिकेत 0-1 ने आघाडीवर आहे आणि विजयाची चव चाखल्यानंतर विराट कोहलीच्या संघाकडून अधिक आक्रमकतेची अपेक्षा असेल, परंतु रूट म्हणाला की त्याच्या संघाने मागील चकमकीतून धडा घेतला आहे आणि कोणतीही अनावश्यक वादविवादात सामील होणार नाही. (IND vs ENG 3rd Test: लीड्स टेस्टपूर्वी इंग्लंडला मोठा फटका, तिसऱ्या सामन्यातून ‘या’ स्टार वेगवान गोलंदाजाची एक्सिट)

“थिएटर आणि खेळाभोवती इतर सर्व काही आहे. आम्हाला खात्री आहे की आम्ही खेळ कसा खेळू इच्छितो ते खेळतो आणि आम्ही शक्य तितक्या चांगल्या प्रकारे त्याची काळजी घेतो, आणि प्रामाणिक नसलेल्या कोणत्याही गोष्टीकडे फारसे विचलित किंवा आकर्षित होऊ नये,” रूटने वर्च्युअल प्री-मॅच मीडिया संवादामध्ये सांगितले. “आपण स्वतःसाठी अस्सल असलो पाहिजे, आपण व्यक्ती म्हणून कसे आहोत आणि आपण एकत्रितपणे कसे आहोत आणि आपण ज्या मार्गाने जाऊ शकतो तितके चांगले असू शकतो. विराटची टीम ते कसे खेळते तसे खेळेल, मला फक्त आपण मैदानात जावे आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे.” इंग्लंडचा कर्णधार म्हणाला, “आम्ही गेल्या सामन्यातून एक चांगला धडा घेतला आहे आणि मला वाटते की काही बाबतीत आम्ही आणखी चांगले करू शकलो असतो. कर्णधार म्हणून मी काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करू शकलो असतो.”

दुसरीकडे, रूट आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करत आहे पण कर्णधारला विश्वास आहे की त्याचे उर्वरित फलंदाज लवकरच फॉर्ममध्ये परततील. “कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोठी भागीदारी. जेव्हा दोन फलंदाज काही काळ क्रीजवर एकत्र राहतात, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसू शकते. फलंदाजी गट म्हणून त्याकडे आमचे लक्ष असायला हवे.”