IND vs ENG Test Series 2021: भारत आणि इंग्लंड टेस्ट सिरीजमध्ये गोलंदाजांची 'कसोटी'; जेम्स अँडरसन, जसप्रीत बुमराह, आर अश्विन यांना रेकॉर्ड ब्रेक कामगिरीची संधी
जसप्रीत बुमराह आणि जेम्स अँडरसन (Photo Credit: PTI, Twitter)

IND vs ENG Test Series 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील चार सामन्यांच्या टेस्ट सिरीजचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. 5 फेब्रुवारीपासून चेन्नई (Chennai) येथे होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ कंबर कसून तयारीला लागले आहे. महत्वाची बाब म्हणजे या मालिकेत दोन्ही संघातील गोलंदाजांची 'कसोटी' लागणार आहे. गोलंदाजांच्या यशस्वी कामगिरीवर संघाचा विजय अवलंबून असू शकतो. जेम्स अँडरसन (James Anderson), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. बुमराह पहिल्यांदाच भारतात टेस्ट सिरीज खेळेल तर अँडरसन पुन्हा एकदा टीम इंडिया (Team India) फलंदाजांना आव्हान देण्यासाठी उत्सुक असेल. अँडरसनने भारताविरुद्ध चार सामन्यांच्या मालिकेत 13 विकेट घेतल्या तर तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय लेगस्पिनर अनिल कुंबळेच्या 619 विकेटच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो. 600 टेस्ट विकेट क्लबमध्ये सामील होणार अँडरसन पहिला वेगवान गोलंदाज आहे. अँडरसनने आजवर 606 कसोटी विकेट घेतल्या आहेत. (IND vs ENG Test Series 2021: विराट कोहलीच्या रडारवर MS Dhoni याचे 3 मोठे रेकॉर्ड, इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये करावे लागणार 'हे' काम)

दुसरीकडे, भारतीय वेगवान गोलंदाज बुमराह 100 टेट्स विकेट क्लबमध्ये सामील होण्याच्या उंबरठ्यावर आहे. बुमराहने 17 सामन्यात 79 विकेट घेतल्या आहेत आणि इंग्लंडविरुद्ध मालिकेत 21 विकेट घेताच तो कसोटी क्रिकेटमध्ये विकेटची शंभरी पार करेल. शिवाय, जर बुमराहने 4 कसोटी मालिकेत ही आश्चर्यकारक कामगिरी बजावली तर तो 100 कसोटी विकेट्स घेणारा वेगवान भारतीय वेगवान गोलंदाजही बनेल. दरम्यान, भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील ऑफस्पिनर अश्विनचे मिशन 23 विकेट्स घेण्यावर असेल. इंग्लिश संघाविरुद्ध 23 विकेट घेताच अश्विनला 400 टेस्ट विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये सामील होईल. सध्या अश्विनने 74 कसोटी सामन्यांमध्ये 25.53 च्या सरासरीने 377 विकेट्स घेतल्या आहेत. आणि सध्याच्या कसोटी मालिकेत अश्विनने हा पराक्रम केलया तो तिसरा फिरकीपटू व चौथा भारतीय गोलंदाज ठरेल.

भारत आणि इंग्लंड संघातील टेस्ट सिरीजमधील पहिले दोन सामने चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर खेळले जातील तर तिसरा व चौथा सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ 5 टी-20 आणि तीन वनडे सामन्यात आमने-सामने येतील.