IND vs BAN 2019:  बांग्लादेश क्रिकेट संघाला भारत दौऱ्यापूर्वी मोठा धक्का!  अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याच्यावर Match-Fixing प्रकरणी बंदीची शक्यता
शाकिब अल हसन (Photo Credit: IANS)

बांग्लादेश (Bangladesh) संघाच्या भारत (India) दौर्‍यापूर्वी एक अशी बातमी आहे जी संपूर्ण बांगलादेश क्रिकेटला हादरवून टाकू शकते. बांगलादेश क्रिकेट बोर्ड, बीसीबीच्या शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे 'कारणे दाखवा नोटीस'ला सामोरे जात असलेल्याअष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्यावर आता आयसीसी (ICC) कडून कारवाई केली जाऊ शकते. बांग्लादेशच्या एकाआघाडीच्या दैनिकात दिलेल्या वृत्तानुसार, मॅच फिक्सिंगचा अहवाल न दिल्याबद्दल शाकिबला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलकडून (आयसीसी) 18 महिन्यांपर्यंतची बंदी घातली जाऊ शकते. वृत्तानुसार, मॅच फिक्सिंगसाठी शाकिबकडे एका बुकीने संपर्क साधला होता, परंतु त्याने आयसीसीला याची माहिती दिली नाही. बांगलादेशच्या दैनिक वर्तमानपत्राने दावा केला आहे की दोन वर्षांपूर्वी फिक्सिंगची ऑफर शाकिबला मिळाली होती. सामन्याआधी एका बुकीने शाकिबकडे संपर्क साधला होता. (IND vs BAN 2019: खराब हवा असूनही दिल्लीमध्येच होणार भारत-बांग्लादेश संघातील पहिला टी-20 सामना, BCCI ने दिले स्पष्टीकरण)

दरम्यान, शाकिबने ही ऑफर नाकारली असली तरी त्याने बेकायदेशीर पध्दतीचा अहवाल दिला नाही आणि त्यामुळे तो आता अडचणीत सापडला आहे. आयसीसीने ब्लॅकलिस्ट केलेल्या बुकीचे कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून आयसीसीला शाकिबच्या मॅच-फ़िक्सिन्गबाबतची माहिती मिळाली. आयसीसी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Anti-Corruption Department) शाकिब माहिती देण्यास अपयशी ठरला, त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अहवालानुसार, शाकिबने आयसीसी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACU) भेट दिली आहे आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (बीसीबी) त्या खेळाडूवर लागू होणाऱ्या संभाव्य बंदीविषयी माहितीही देण्यात आली आहे. शाकिबवर सर्व प्रकारच्या क्रिकेटची बंदी घालण्यात येणार असून त्याला सहा महिने किमान शिक्षा दिली जाऊ शकते. अहवालानुसार, आयसीसीकडून लवकरच शाकिबच्या बंदीची पुष्टी होण्याची अपेक्षा आहे. शाकिबवर बंदीची कारवाई, ही बांग्लादेश क्रिकेटसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. उद्या, बुधवारी बांग्लादेशी संघ भारत दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.