IND vs AUS 1st Test Day 2: बुमराह-अश्विनच्या अचूक माऱ्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज ढेर, मार्नस लाबूशेनने सावरला डाव, Tea पर्यंत भारताकडे 152 धावांची आघाडी
मार्नस लाबूशेन (Photo Credit: Getty)

IND vs AUS 1st Test Day 2: अ‍ॅडिलेडमधील (Adelaide) पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ (Australian Team) अडचणीत सापडला आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातील भारतीय संघाला (Indian Team) 244 धावांवर रोखल्यावर पहिल्या पिंक-बॉल सामन्यात ऑस्ट्रेलियाने चहापान पर्यंत 5 विकेट गमावून 92 धावांपर्यंत मजल मारली. Tea ब्रेकपर्यंत मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) नाबाद 46 धावा आणि टिम पेन नाबाद 9 धावा करून खेळत आहेत. संध्याकाळी चहाच्या वेळेपर्यंत भारताने पहिल्या टेस्ट सामन्यात 152 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहनंतर (Jasprit Bumrah) रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) कांगारू फलंदाजांना आपली फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. बुमराह आणि अश्विन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणीत वाढ केली. ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे तीनही फलंदाज एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. जो बर्न आणि मॅथ्यू वेडने प्रत्येकी 8 धावा केल्या तर नंबर-एक कसोटी फलंदाज स्टिव्ह स्मिथ एक धावच करू शकला. (IND vs AUS Test 2020-21: बॉक्सिंग डे टेस्ट खेळण्यास डेविड वॉर्नर उत्सुक, भारताविरुद्ध पूनरागमना संदर्भात केला 'हा' दावा)

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताचा पहिला डाव 244 धावांवर संपुष्टात आल्यावर बुमराहने गोलंदाजीने लंचपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीला स्वस्तात माघारी धाडलं. बुमराहने दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी पाठवत कांगारू संघाना सुरुवातीलाच मोठे झटके दिले. लाबूशेन एकाबाजूने खिंड लढवत होता. स्मिथ त्याच्या साथीला आल्यावर दोन्ही फलंदाजांकडून संघाचा डाव सावरण्याची अपेक्षा केली जात होती, मात्र स्मिथ धावा करताना संघर्ष करताना दिसला. अखेर स्मिथला 29 चेंडूवर एकच धाव करता आली. अश्विनने स्मिथला स्लिपमध्ये उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे झेलबाद केलं. त्यानंतर ट्रेव्हिस हेड देखील लाबूशेनला जास्तकाळ साथ देऊ शकला नाही. अश्विनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅमरुन भारतीय कर्णधार विराटकडे झेलबाद झाला. युवा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटरने पदार्पणाच्या सामन्यात 11 धावा केल्या.

दरम्यान, भारताकडून कर्णधार कोहलीने सर्वाधिक 74 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा 43 तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 42 धावा केल्या. पुजारा आणि रहाणेने चांगली सुरुवात केली पण मोठा डाव खेळू शकले नाही. पृथ्वी शॉ शून्यावर तर मयंक अग्रवाल 17 धावांवर माघारी परतला. सलामी जोडी अपयशी ठरल्यावर पुजारा, कोहली आणि रहाणेने आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्कने 4 विकेट घेतल्या तर पॅट कमिन्सला 3 विकेट मिळाल्या. जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.