Ind vs Aus 1st Test 2020: एडिलेडच्या पिचसंदर्भात वासीम जाफर यांनी विचारला झोंबणारा प्रश्न; भारताची बदनामी करणाऱ्यांना दिले चोख प्रत्युत्तर
Wasim Jaffer (Photo Credits: PTI)

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या (Ind Vs Aus) यांच्यात एडिलेडच्या (Adelaide) ओव्हल स्टेडिअमवर पहिली डे-नाइट टेस्ट मॅच खेळली जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघावर 62 धावांची घेतली आहे. मात्र, आजच्या एका दिवसात एकूण 15 विकेट पडल्या आहेत. यामध्ये भारताने पहिल्या डावात पाच तर, ऑस्ट्रेलियाच्या दहा विकेट पडल्या आहेत. यावर भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एडिलेडच्या पिचसंदर्भात वासिम जाफर (Wasim Jaffer) यांनी झोंबणार एक प्रश्न विचारला आहे. तसेच भारताची बदनामी करणाऱ्यांनाही ट्विटरच्या माध्यमातून चोख उत्तर दिले आहे.

विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर 244 धावांचे आवाहन ठेवले होते. त्यानंतर रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 191 धावांवर रोखले. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ लागोपाठ दुसऱ्या डावातही अपयशी ठरला आहे. नाइट वॉचमन म्हणून आलेला बुमराह (0) आणि सलामी फलंदाज मयांक अगरवाल (5) नाबाद आहेत. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाकडे 62 धावांची आघाडी आहे. हे देखील वाचा- Do Female Cricketers Wear Guards: पुरुषांप्रमाणेच महिला क्रिकेटपटूही गार्ड घालतात? जाणून घ्या

वासीम जाफर यांचे ट्विट-

दरम्यान, दुसऱ्या डावातही खराब प्रदर्शन करणाऱ्या पृथ्वी शॉबाबत वासीम जाफर यांनी आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीमध्ये खूप फरक आहे. ऑस्ट्रेलियात आपण प्रत्येक बॉलवर ड्राईव्ह मारू शकत नाही. कारण तिथे बॉलला अधिक बाऊन्स मिळतो. आपल्याला कोणता बॉल खेळायचा आहे आणि कोणता सोडायचा आहे? याची आपल्याला पूर्ण कल्पना असायला हवी, असेही ते म्हणाले आहेत.