IPL Auction 2025 Live

Ind Beats Pak, T20 WC 2023: भारताने फोडला पाकिस्तानच्या गर्वाचा फुगा, टी-20 वर्ल्ड कपमध्ये चारळी धूळ

या विजयाच्या रुपात भारताने महिलांच्या टी-20 विश्वचषक (Women's T20 World Cup) सामन्यात विजयी सुरुवात केली. पाकिस्ताने भारतासमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाटलाग करताना भारताने तडाखेबंद खेळी करत पाकिस्तानवर विजय मिळवला.

India and Pakistan Women Cricketers in Action (Photo Credits: @ICC/Twitter)

भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाच्या रुपात भारताने महिलांच्या टी-20 विश्वचषक (Women's T20 World Cup) सामन्यात विजयी सुरुवात केली. पाकिस्ताने भारतासमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाटलाग करताना भारताने तडाखेबंद खेळी करत पाकिस्तानवर विजय मिळवला. लक्ष्याचा पाटलाग करताना 14 व्या षटकावेळी भारत 3 गडी बाद 93 धावा अशा मजबूत स्थितीत होता. आजच्या विजयात , ऋचा घोष (Richa Ghosh - 20 चेंडूत 31 धावा) आणि जेमिमाह रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues- 38 चेंडूत 53 धावा) यांच्यातील 58 धावांच्या शानदार भागीदारीची महत्त्वाची भूमिका राहिली.

विजयाचा थरार थोडक्यात

पाकिस्तानने ठेवलेल्या लक्ष्याचा पाटलाग करताना शेवटच्या काही मिनीटांमध्ये भारताच्या जेमीनी रॉड्रिग्जने शेवटचा फटका मारला जो थेट सीमारेशेपलीकडे चौकाराच्या रुपात पोहोचला. या चौरानेच भारताच्या विजयाची निश्चीती केली. यासोबतच तिचे अर्धशतकीही पूर्ण झाले. अल्पावधीचच रॉड्रिग्जने स्वत:ला आणखी भक्कम केले आणि ऋचा घोषच्या सोबत भारताने एक षटक बाकी असताना 7 गडी राखून विजय मिळवला.

भारताकडून शेफाली वर्मा हिने 33 धावांची खेळी करून भारताच्या विजयाची पायाभरणी केली. पुढे रॉड्रिगियसने 38 चेंडूत 53 धावा ठोकल्या, तर घोषने 20 चेंडूत 31 धावा केल्या. पाकिस्तानची फलंदाजी चांगली होती पण गोलंदाजीमध्ये ते गारद झाले.

पाकिस्तानचे काय झाले?

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपला निर्णय पाकिस्तानला सार्थ ठरवता आला नाही. पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीतील जवेरिया खान केवळ 8 धावांवर झटपट बाद झाली. तिथून पुढे पाकिस्तानची जोरात पडझड होत राहिली. दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर ती हरमनप्रीत कौर हिच्याकरवी झेलबाद झाली. बिस्माह मारूफ आणि मुबीना अली (12) यांनी नंतर चांगली भागीदारी केली. या जोडीने राधा यादवच्या गोलंदाजीवर अली यष्टीचीत (स्टंपआऊट) होण्यापूर्वी पाकिस्तानची धावसंख्या 42 पर्यंत नेली.

भारत पाकिस्तान महिला क्रिकेट संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.

पाकिस्तान: बिस्माह मारूफ (कर्णधार), आयमान अन्वर, आलिया रियाझ, आयशा नसीम, सदफ शमास, फातिमा सना, जवेरिया वदूद, मुनीबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.