Photo Credit- X

India vs New Zealand ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: वुमन्स टी20 वर्ल्डकप सुरु झाला आहे. पहिल्या दिवशी बांगलादेश विरोधात स्कॉटलंड आणि पाकिस्तान विरोधात श्रीलंकेचा सामना झाला. विश्वचषकाच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा न्यूझीलंड सोबत सामना होणार आहे. बांगलादेशने स्कॉटलंडचा पराभव केला. बांगलादेशने स्कॉटलंडला 16 धावांनी पराभूत केलं. आता भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार आहे. साखळी फेरीत एकूण चार सामने खेळायचे आहेत. त्यामुळे तीन सामन्यात काहीही करून विजय मिळायलाच हवा. 4 ऑक्टोबरला भारता आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार आहेत. भारताचं नेतृत्व हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. भारतीय विजयी सलामी देत स्पर्धेला सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. पण न्यूझीलंडचं आव्हान काही सोपं नसेल. (हेही वाचा: BAN vs SCO ICC Women T20 World Cup 2024: वुमन्स टी20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशची विजयी सलामी; बांगलादेशचा स्कॉटलंडवर 16 धावांनी विजय)

भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला टी20 विश्वचषकाचा सामना कधी खेळला जाईल?

महिला टी20 विश्वचषका 2024मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. शुक्रवारी, 4 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना होईल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वुमन्स टी20 वर्ल्डकप सामना कुठे खेळला जाईल?

महिला टी20 विश्वचषका 2024मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 सामना थेट कसा पाहायचा?

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्ट्रिमिंग डिस्ने + हॉटस्टारवर होईल. तुम्ही डिस्ने + हॉटस्टारवर हा सामना विनामूल्य पाहू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारत संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, साजवान पाटील

न्यूझीलंड संघ: सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, इझी गेज, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, फ्रान जोनास, लेह कॅस्परेक, मेली केर, जेस केर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोवे, ली ताहुहू