रिषभ पंत यांच्यानंतर हार्दिक पंड्या बनला बेबीसिटर, शेअर केला हा अतिशय प्रेमळ व्हिडिओ
(Photo Credit: hardikpandya93/Instagram)

टीम इंडियाचा युवा विकेटकिपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बेबीसिटर म्हणून प्रसिद्ध झाला आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दौऱ्यादरम्यान पंत कांगारूंचा टेस्ट कर्णधार टिम पेन (Tim Paine) याच्या मुलांना बेबीसिट करताना दिसला. पण, आता टीम इंडियाला अजून एक बेबीसिटर मिळाला आहे. आणि तो दुसरा कोणी नव्हे तर अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आहे. हार्दिक भाऊ क्रुणालसह सध्या क्रिकेटमधून ब्रेक एन्जॉय करत आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पंड्या बंधू मुंबईच्या रस्त्यांवर लॅम्बोर्गिनी हुराकन एव्हो गाडी चालवताना दिसले. पंड्या बंधूंच्या या नवीन गाडीची किंमत 73.7373 कोटी (एक्स-शोरूम) आहे. (Koffee With Karan च्या वादावर केएल राहुलने सोडले मौन, हार्दिक पंड्या सह मैत्रीवर केले हे मोठे विधान)

आणि आता हार्दिक आपल्या फ्री वेळात जतीन सप्रू (Jatin Sapru) याच्या छोट्या मुलीला बेबीसिट करताना दिसला. हार्दिकने त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आणि तो व्हायरल होत आहे. जतीन सप्रू हा क्रीडा प्रसारण क्षेत्रामधील सर्वात नामांकित चेहरा आहे.

 

View this post on Instagram

 

Babysitting Sunday 😍❤️ For #thatcricketguy @jatin_sapru

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिक सध्या टीम इंडियाच्या बाहेर आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी देखील त्याला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. अशा स्थितीत हार्दिक सोशल मीडियावर काही न काही कारणांनी चर्चेत बनून राहिला आहे. मागील पाहिलं महिन्यांपासून हार्दिक आणि बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्यातील संबंधांच्या चर्चांना उधाण आले होते. उर्वशीने हार्दिकला विश्वचषक सामन्यासाठी तिकिटांची व्यवस्था करण्यास सांगितले असल्याचे वृत्त देखील समोर आले होते. मात्र, दोघांनी यांना अफ़वाह म्हणून नाकारले.