ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) तयारीला वेग आला आहे. क्रिकेटची सर्वात मोठी आयसीसी टूर्नामेंट वर्ल्ड कप या वर्षी जून महिन्यात सुरू होत आहे. विश्वचषकाचा पहिला सामना 1 जून रोजी होणार आहे. याशिवाय या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आली आहे. भारताचा अनुभवी खेळाडू युवराज सिंगला संघात मोठी जबाबदारी मिळू शकते. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. (हे देखील वाचा: IND vs AFG 2nd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात उद्या रंगणार दुसरा टी-20 सामना, सगळ्यांच्या नजरा असेल 'या' दिग्गज खेळाडूंवर)
11 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ
युवराज सिंग हा भारतातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. भारतीय संघ गेल्या 11 वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. भारताने शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. यानंतर भारताने अनेकवेळा फायनल किंवा सेमीफायनल गाठली आहे, पण एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. अशा स्थितीत भारतीय संघाने दडपणाखाली खेळण्याची सवय लावायला हवी. भारताचा अनुभवी खेळाडू आणि 2-2 विश्वचषक विजेत्या संघाचा खेळाडू युवराज सिंग ही जबाबदारी पार पाडू शकतो.
STORY | Yuvraj Singh hints at mentoring role to prepare Team India for challenges ahead
READ: https://t.co/ilHSwpju5S
(PTI File Photo) pic.twitter.com/K9DhG5ERm2
— Press Trust of India (@PTI_News) January 13, 2024
काय म्हणाला युवराज सिंह
भारतीय संघातील खेळाडू खूप चांगले आहेत, पण ते दडपण सहन करू शकत नसल्याचे खुद्द युवराज सिंगने म्हटले आहे. भारताच्या एक-दोन खेळाडूंनी दडपण सहन केले तर काहीही होणार नाही, भारतीय संघ तेव्हाच जिंकेल जेव्हा सर्व खेळाडूंमध्ये दबावाखाली चांगली कामगिरी करण्याची क्षमता असेल. तो पुढे म्हणाला की, मला माझा अनुभव भारताच्या युवा खेळाडूंना द्यायचा आहे. माझी मुलं मोठी झाल्यावर मी क्रिकेटला वेळ देऊ इच्छितो आणि खेळाडूंना दबावाखाली खेळायला शिकवू इच्छितो. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, युवराज सिंगला स्वतः भविष्यात भारतीय संघासोबत काम करायचे आहे. अशा परिस्थितीत युवराज सिंगला टी-20 विश्वचषकात मेंटॉर म्हणून संघात समाविष्ट केले जाऊ शकते किंवा त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.