'टीम इंडिया गेल्या काही वर्षांमध्ये सर्वात स्पर्धात्मक' म्हणत गौतम गंभीर याने ICC टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अव्वल स्थानावर केला सवाल
गौतम गंभीर (Photo Credit: ANI)

टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने मागील आठवड्यात आयसीसीने जाहीर केलेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) ऑस्ट्रेलियाला (Australia) पहिले का स्थान देण्यात आले यावर सवाल उपस्थित केला. गंभीर म्हणाला की, अलिकडच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये भारताने (India) अधिक प्रभाव पाडला आहे. टीमने विदेशी भूमीवर विशेषत: ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवला आहे. भारताला पछाडत टिम पेनच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान मिळवले, तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ न्यूझीलंडच्या मागे तिसर्‍या स्थानावर घसरला. स्टार स्पोर्ट्स ’क्रिकेट कनेक्टेड चॅट शो’ वर बोलताना गंभीरने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स सिस्टमवर टीका केली. “नाही, मला आश्चर्य वाटले नाही. मला पॉइंट्स आणि रँकिंग सिस्टमवर विश्वास नाही. बहुधा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वात वाईट परिस्थिती होती ... जेव्हा आपण घराबाहेर एक कसोटी सामना जिंकता तेव्हा आपण समान गुण जिंकता. ते हास्यास्पद आहे.” (ICC Rankings: ऑस्ट्रेलियाचा टीम इंडिया, पाकिस्तानला दे धक्का; आयसीसी टेस्ट आणि टी-20 रँकिंगमध्ये मिळवले अव्वल स्थान)

गंभीर पुढे म्हणाला की गेल्या काही वर्षांत भारत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात स्पर्धात्मक टीम ठरली आहे. "होय. 100 टक्के. एकूणच प्रभावाच्या दृष्टीकोनातून पाहायचे झाले तर भारताने घराबाहेर मालिका गमावली परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला. ते सर्वात स्पर्धात्मक बाजू आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत कसोटी जिंकली, इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकला ... बहुतेक देशांनी असे केले नाही,” तो म्हणाला. गंभीर पुढे म्हणाला की गेल्या काही वर्षांत प्रवास करताना ऑस्ट्रेलिया सर्वोत्तम राहिलेला नाही. “माझ्यासाठी भारत तिथे असावा कारण ऑस्ट्रेलिया...मला गंभीर शंका आहे आपण कोणत्या आघाडीवर ऑस्ट्रेलियाला प्रथम क्रमांकाची कसोटी क्रमवारी दिली आहे? ते घराबाहेर, खासकरुन उपखंडात पूर्णपणे दयनीय आहेत.”

आयसीसीने 2016-17 चा हंगाम या रँकिंग सिस्टममधून काढून टाकला. ऑस्ट्रेलियाने फक्त टेस्ट नाही तर टी-20 क्रमवारीतही अव्वल स्थान मिळवले आहे. वनडे रँकिंगमध्ये इंग्लंडने पहिले स्थान कायम ठेवले आहे.