सौरव गांगुली-एमएस धोनी नव्हे, गौतम गंभीर ने 'या' क्रिकेटरला म्हटले आपला सर्वश्रेष्ठ कर्णधार; कौतुक करत केले मोठे विधान
गौतम गंभीर आणि सौरव गांगुली (Photo Credit: IANS)

टीम इंडियाचा (Indian Team) सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण आहे अशी भारतीय क्रिकेटमध्ये बर्‍याचदा चर्चा रंगली आहे.  गौतम गंभीर (Gautam Gambhir) 13 वर्षा हुन अधिकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारताच्या काही उत्कृष्ट कर्णधारांच्या नेतृत्वात खेळला. विराट कोहलीने पदभार स्वीकारण्याआधी सौरव गांगुली (Sourav Ganguly), महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni), राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) यासारख्या खेळाडूंनी भारताचे नेतृत्व केले. गंभीरने गांगुलीच्या नेतृत्वात पदार्पण केले आणि धोनीच्या नेतृत्वात 2007 आणि 2011 अशा दोन वर्ल्ड कप विजेत्या टीमचा तो सदस्य होता. तथापि, भारताच्या माजी सलामी फलंदाजाने कुंबळेची सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवड केली. द्रविडनंतर नोव्हेंबर 2007 मध्ये या दिग्गज लेगस्पिनरची नेमणूक करण्यात आली होती. त्यावेळी धोनी वनडे आणि टी-20 कर्णधार होता आणि त्याला खेळाच्या सर्वात शुद्ध फॉर्मचे नेतृत्व सोपविणे फार लवकर समजले जायचे. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात कुंबळेने बोटाच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत होणाऱ्या सामन्यात निवृत्त घेण्यापूर्वी 14 कसोटी सामन्यात भारताचे कर्णधार म्हणून नेतृत्व केले. (एमएस धोनी की रोहित शर्मा; गौतम गंभीर, संजय बांगर यांनी निवडला IPL इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार)

स्टारने स्पोर्ट्स शो 'क्रिकेट कनेक्टेड'मध्ये भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून गंभीरने वर्णन केले. तो म्हणाला, "रेकॉर्डच्या बाबतीत महेंद्र सिंह धोनी अव्वल स्थानावर आहे, पण माझ्यासाठी कुंबळे ज्याच्या अंतर्गत मी खेळलो तो सर्वोत्तम कर्णधार आहे." गंभीर म्हणाला जर कुंबळेने दीर्घकाळ कर्णधारपद सांभाळले असते तर ते सर्व विक्रम मोडू शकले असते. गंभीर म्हणाले, "गांगुलीने खरोखर चांगले काम केले. पण माझ्याकडून नेहमीच कुंबळेला संघाचे नेतृत्व करावे असे वाटत होते. त्याच्या नेतृत्वात मी सहा कसोटी सामने खेळलो. त्यांनी अधिक काळासाठी संघाचे नेतृत्व केले असते तर त्यांनी सर्व विक्रम मोडले असते."

कुंबळेचे कौतुक करत गंभीर म्हणाला, "कर्णधार आणि नेता यामध्ये फरक आहे. माझ्या कारकिर्दीत मी बऱ्याच कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलो. अनिल कुंबळे हा त्यापैकी सर्वात निस्वार्थी आणि प्रामाणिक माणूस आहे. मी त्यांच्याकडून बरेच काही शिकलो आहे." गंभीर स्वत: आयपीएलच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाइट राइडर्सने दोनदा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. दुसरीकडे, राहुलने कर्णधारपद सोडल्यानंतर नोव्हेंबर 2007 मध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या 17 व्या वर्षी कुंबळेने कर्णधारपदाचा कार्यभार स्वीकारला. कुंबळेने कसोटी सामन्यात 619 आणि वनडेमध्ये 337 गडी बाद केले आहेत. निवृत्तीनंतर धोनीने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधारपद स्वीकारला.