Video: एमएस धोनी याच्या बालेकिल्ल्यात रिषभ पंत याने ठोकले तुफानी अर्धशतक, चेन्नईमध्ये झाला 'पंत-पंत' चा जयघोष
रिषभ पंत (Photo Credits: Getty Images)

वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या (India) मधल्या फळीतील यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) यातने आपल्या शानदार अर्धशतकासह टीकाकारांची बोलती बंद केली. टीम इंडियाच्या या यष्टिरक्षकने वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध 69 चेंडूत 71 धावांची अर्धशतकी खेळी केली आणि वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. चेन्नईच्या कठीण खेळपट्टीवर पंतने विकेटवर दृढ फलंदाजी केली आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्यासह 114 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यादरम्यान सर्वात महत्वाचे म्हणजे महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या चेन्नईमध्ये पंतला खूप पाठिंबा मिळाला आणि चेपॉकचे 'पंत-पंत'च्या घोषणेना गूंजले. मैदानात झेल सोडल्यानंतर किंवा लवकर बाद झाल्यावर स्टेडियममध्ये धोनी-धोनीच्या घोषणा होते, परंतु चेन्नईमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळाले. (IND vs WI 1st ODI: चेन्नई वनडेमध्ये शिमरोन हेटमेयर-शाई होप ची तुफान बॅटिंग; वेस्ट इंडिजचा भारतावर 8 विकेटने विजय)

धोनीच्या चाहत्यांनी पंतला पाठिंबा देणारी पोस्टर्स आणले आणि त्याच्यावर ऑल द बेस्ट पंत लिहिले. धोनीच्या चाहत्यांना पंतने निराश केले नाही आणि त्याने 7 चौकार आणि एक षटकार मारत 71 धावांची तुफान खेळी केली. चेन्नईच्या कठीण खेळपट्टीवर त्याचा स्ट्राईक रेट 100 च्या वर होता, जो उल्लेखनीय आहे. पंतच्या खेळीच्या वेळी, पंत-पंतच्या घोषणांनी चेपाकांचे स्टेडियम गुंफले आणि यामुळे या युवा क्रिकेटपटूचे मनोधैर्य नक्कीच वाढले असेल. पाहा हा व्हिडिओ:

दरम्यान, पंतचे हे पहिले वनडे अर्धशतक होते. टी -20 आणि वनडे अर्धशतक झळकावणारा तो सर्वात युवा भारतीय विकेटकीपर देखील ठरला आहे. सतत फ्लॉप होत असलेल्या पंतसाठी चेन्नईचे अर्धशतक महत्त्वपूर्ण आहे. पंतने अलीकडे कित्येक सामन्यांमध्ये फलंदाजीने चांगली कामगिरी केलेली नाही. टी-20 विश्वचषक जवळ येत असताना सतत धावा करण्याचा दबाव त्याच्यावर वाढत आहे. दुसरीकडे, पंत आणि श्रेयसचीही खेळी व्यर्थ ठरली. भारताने दिलेले 288 धावांचे लक्ष्य विंडीजने 8 गडी राखत गाठले. विंडीजकडून शिमरोन हेटमायर आणि शाई होप यांच्या शतकी खेळीने संघाचा विजय निश्चित केला.