इऑन मॉर्गन ने अफगाणिस्तान च्या कुटुंबासह क्रिकेट खेळ घालवला वेळ, रशीद खान ने 'Legend' म्हणत केले संबोधीत
इऑन मॉर्गन (Photo Credits: @Eoin16/Twitter)

इंग्लंडचा संघनायक इऑन मॉर्गन (Eoin Morgan) ने निकतेचं आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकचे जेतेपद मिळवून देण्यास महत्वाचे योगदान केले. न्यूझीलंडविरुद्ध फायनल सामना जिंकत मॉर्गन हा इंग्लंड चा (England) पहिला विश्वचषक विजेता कर्णधार बनला. मॉर्गन टेस्ट क्रिकेट खेळत नाही त्यामुळे सध्या तो आपला सगळा वेळ दुसऱ्या कामांमध्ये घालवत आहे. विश्वचषक फायनलच्या एक आठवड्यानंतर एका स्थलांतरित अफगाणिस्तान (Afghanistan) कुटुंबाला इंग्लंडच्या कर्णधारासोबत क्रिकेट खेळात थोडा वेळ घालवण्याची संधी मिळाली. मॉर्गनने ट्विटरवर या कुटुंबाबरोबरचा एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. (Ashes 2019: शेन वॉर्नने निवडला इंग्लंड-ऑस्ट्रेलिया 12 सदस्यीय अॅशेस संघ; जोफ्रा आर्चर, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश)

फोटो शेअर करताना मॉर्गनने लिहिले, "आज घरी मला संध्याकाळी रात्रीच्या जेवणानंतर या सुंदर अफगाणिस्तान कुटुंबासह क्रिकेट खेळायला सांगितले गेले. # खेळाचीशक्ती" असे सुंदर ट्विट मॉर्गन याने केले. दुसरीकडे, मॉर्गनने शेअर केलेला हा हृदयस्पर्शी क्षण पाहून नेटकरी देखील स्वतःला सावरू शकले नाही. या नेटकऱ्यांमध्ये अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खान (Rashid Khan) देखील आहे. रशीदने मॉर्गनने शेअर केलेल्या फोटोवर आपली प्रतिक्रिया देत इंग्लंड कर्णधाराला 'लेजेंड' म्हणून संबोधले आहे.

दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला (Nelson Mandela) यांनी एकदा सांगितले की, 'खेळामध्ये जगातील बदल करण्याची शक्ती आहे.' आणि आज ते सातत्यात उतरताना दिसत आहे. दरम्यान, युद्धात बुडालेल्या अफगाणिस्तानमधील अनेक शरणधारकांना इंग्लंडमध्ये स्थलांतरित केले गेले आहे. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ओएनएस) च्यानुसार अंदाजानुसार 2015 मध्ये 70,000 पेक्षा अधिक अफगाणिस्तान नागरिक इंग्लंडमध्ये निर्वासित होते.

आयर्लंड (Ireland) मध्ये जन्मलेला मॉर्गन क्रिकेट विश्वचषक जिंकण्यासाठी प्रथम इंग्लिश कर्णधार बनला. 2014 मध्ये मॉर्गनला इंग्लंडच्या कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला होता. व्यवस्थापन कायम मॉर्गनच्या पाठीशी राहिला आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने वनडे क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करून दाखवली.