IND vs ENG (Photo Credit - X)

India National Cricket Team vs England National Cricket Team, 2nd T20I 2025 Match:  भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (T20 Series)  दुसरा सामना शनिवारी म्हणजेच 25 जानेवारी रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईतील  (Chennai) एमए चिदंबरम स्टेडियमवर  (MA Chidambaram Stadium) खेळला जाईल. पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने प्रवेश करेल. तर, टीम इंडियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे.  (हेही वाचा  -  Ranji Trophy 2025: 25 चौकार आणि 3 षटकारांसह, कर्नाटकच्या तरुण खेळाडूची आक्रमक खेळी, पंजाबविरुद्ध रणजीमध्ये झळकावले द्विशतक)

या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler)  खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)  करत आहे. दरम्यान, इंग्लंडने दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गस अ‍ॅटकिन्सन खेळणार नाही. त्याच्या जागी ब्रायडन कार्सला संधी देण्यात आली आहे

पाहा पोस्ट -

दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडेन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.