ECB ला होऊ शकते 2800 कोटींचे नुकसान, कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटचे आयोजन नसल्यास बोर्डालासहन करावे लागेलमोठे नुकसान
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड लोगो (Photo Credit: Getty)

कोविड-19 (COVID-19) मुळे आगामी सीझनमध्ये क्रिकेटचे आयोजन न झाल्यास इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) 300 दशलक्ष पौंड (2800 कोटी रुपये) चे नुकसान सहन करावे लागेल. या बद्दल ईसीबी प्रमुख टॉम हॅरिसन (Tom Harrison) यांनी माहिती दिली. या संकटावर मात करण्यासाठी वेतनात कापत करणाऱ्या ईसीबी कर्मचाऱ्यांपैकी हॅरिसन यांचाही समावेश आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, इंग्लंडच्या केंद्रीय करारातील खेळाडूंनी ईसीबीने पगाराच्या 20 टक्के कपात करण्याची ऑफर नाकारू शकते. महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी बोर्ड अशा योजना आखत आहे. सध्याच्या संकटाला तोंड देण्यासाठी ईसीबीने मंगळवारी दहा लाख पौंडचे पॅकेज जाहीर केले. 2016-17 मध्ये ईसीबीची ठेवी भांडवल 7 कोटी 30 लाख पौंड होती, जी 2018-19  मध्ये कमी होऊन 10 लाख पौंड इतकी राहिली. अशा स्थितीत जरा या हंगामात क्रिकेटचे आयोजन न झाल्यास ईसीबीच्या आर्थिक फंडावर मोठा परिणाम होऊ शकतो. (कोरोना व्हायरसमुळे कापला जाणार इंग्लंड क्रिकेटपटूंचा पगार; जो रूट, बेन स्टोक्ससह अन्य खेळाडूंच्या वेतनात होणार कोटींची कपात)

कोविड-19 मुळे इंग्लंड बोर्डाने सर्व प्रकारचे व्यावसायिक क्रिकेट 28 मे पर्यंत स्थगित केले आहे. यावर्षी काउन्टी सत्राबाबत अनिश्चितता आहे. काऊन्टी सत्र 12 एप्रिलपासून सुरू होणार होते. आजवर मिळालेल्या आकडेवारीनुसार जगभरात 40,000 लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांना याची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत हॅरिसनला केंद्रीय करारासह खेळाडूंच्या पगारामध्ये 20 टक्के कपात करावीशी वाटते आणि खेळाडूंनी ते स्वीकारले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे.

असोसिएशन ऑफ प्रोफेशनल क्रिकेटर्स (पीसीए) चे प्रमुख टोनी आयरिस यांना पाठवलेल्या पत्रात हॅरिसन यांनी साथीच्या दीर्घकालीन परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात हॅरिसनने त्यांचा पुढील तीन महिन्यांत आपला पगार 25 टक्क्यांनी कमी करत असल्याचा दावा केला आहे. हॅरिसनने लिहिले की, "खेळासाठी सध्या हा आजार सर्वांत मोठे आव्हान आहे, जरी त्याचा संपूर्ण परिणाम क्रिकेटवर अद्याप माहित नसला तरी तो अत्यंत महत्वाचा असेल हे स्पष्ट आहे."