IND vs SL 2nd ODI: टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकाने टाॅस जिंकून प्रथम फंलदांजी करण्याचा निर्णय घेवुन भारतासमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते. घातक गोलंदाजी करत कुलदीप आणि सिराजने प्रत्येकी तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करत भारताने 4 गडी राखुन हा सामना जिंकला आणि ही मालिकाही आपल्या नावावर केली आहे. श्रीलंकेसाठी सलामीवीर नुवानिडू फर्नांडोने सर्वाधिक 50 धावा केल्या. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या. (हे देखील वाचा: Mohammad Siraj New Record: टीम इंडियाचा वेगवान गोलंदांज मोहम्मद सिराजने केला अनोखा विक्रम, जगातील एकही गोलंदाज जवळपास नाही)
2ND ODI. India Won by 4 Wicket(s) https://t.co/MY3Wc5253b #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 12, 2023
लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला सुरुवातीचे धक्के बसले. यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पांड्याने संघाची धुरा सांभाळली. टीम इंडियाने 43.2 षटकांत सहा गडी गमावून (219) लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून केएल राहुलने सर्वाधिक नाबाद 64 धावा केल्या.
श्रीलंकेकडून चमिका करुणारत्ने आणि लाहिरू कुमाराने प्रत्येकी दोन गडी बाद केले. टीम इंडियाने पहिला सामना 67 धावांनी जिंकला होता. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम येथे दुपारी 1.30 वाजल्यापासून खेळवला जाईल.