वेगवेगळ्या फॉरमॅटमधील कर्णधारपदावर चर्चा, BCCI राहुल द्रविड-रोहित शर्माशी साधणार संवाद
Rahul Dravid And Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

BCCI: बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना मुंबईत विशेष बैठकीसाठी बोलावले आहे. 1 डिसेंबरला बांगलादेशला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयचे (BCCI) अधिकारी माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार-प्रशिक्षक जोडीला भेटतील. ही टी-20 विश्वचषकाची आढावा बैठक असल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बैठकीत वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षकांबद्दल चर्चा होऊ शकते. यादरम्यान काही आउटगोइंग सिलेक्टर्सही उपस्थित राहू शकतात. बीसीसीआय सध्या संकटात आहे. बोर्डाला वेगळे कर्णधार नको असल्याने विराट कोहलीला वनडे आणि कसोटी कर्णधारपदावरून वगळण्यात आले. आता रोहित शर्माच्या वाढत्या वयानुसार आणि 2024 च्या टी-20 विश्वचषकाची योजना त्याला तसे करण्यास भाग पाडू शकते.

बीसीसीआय टी-20 मध्ये वेगळ्या कर्णधाराच्या विचारात

रोहित शर्मा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदी कायम राहणार आहे. पुढील वर्षाच्या शेवटी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकानंतर या दोन फॉरमॅटमधील त्याचे भवितव्य ठरवले जाऊ शकते. बीसीआय टी-20 मध्ये वेगळ्या कर्णधाराचा विचार करत आहे. टीम इंडियाला पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी अनेक द्विपक्षीय मालिकांमध्ये भाग घ्यायचा आहे. त्यामुळे मंडळ पर्यायी विचार करत आहे. बीसीसीआय याबाबतीत इंग्लंडच्या पावलावर पाऊल ठेवू शकते. द्रविड कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहे. टी-20 मध्ये नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती होऊ शकते. (हे देखील वाचा: India's Tour of Bangladesh 2022: बांगलादेश दौऱ्यासाठी हा खेळाडू कसोटी संघात रवींद्र जडेजाची घेवु शकतो जागा)

हार्दिक पांड्या संभाळत आहे टी-20 कर्णधार

टी-20 विश्वचषकानंतर हार्दिक पांड्या टी-20 मध्ये संघाची कमान सांभाळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली. यादरम्यान त्याने 1-0 असा विजय मिळवला. हार्दिक अद्याप नियमित कर्णधार नाही, पण रोहित शर्माच्या जागी तो आघाडीवर आहे. त्यांच्यानंतर ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्या नावाची चर्चा आहे.